Digital Arrest चा धक्कादायक प्रकार; वृद्ध महिलेला एक महिना डिजिटल कोठडी

98
Digital Arrest चा धक्कादायक प्रकार; वृद्ध महिलेला एक महिना डिजिटल कोठडी
  • प्रतिनिधी 

डिजिटल अरेस्ट नंतर एक महिना डिजिटल कोठडीचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. सायबर माफियांनी दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका ७७ वर्षीय वृद्धेला एक महिन्यापेक्षा अधिक काळ डिजिटल कोठडीत ठेवून ३ कोटी ८० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर माफियांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्याची धमकी देऊन या वृद्धेला डिजिटल कोठडीत बंदिस्त करून ठेवले होते. (Digital Arrest)

ही वृद्ध महिला सेवानिवृत्त पतीसह दक्षिण मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहण्यास आहे. तिची दोन्ही मुले परदेशात राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वृद्ध महिलेला प्रथम व्हॉट्सॲपवर कॉल आला होता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने तिला सांगितले की तिने तैवानला पाठवलेले पार्सल थांबवले आहे आणि त्यात पाच पासपोर्ट, एक बँक कार्ड, ४ किलो कपडे, मेफेड्रोन हा अमली पदार्थ इत्यादी वस्तू सापडल्या आहेत. तक्रारदार महिलेने कॉलरला सांगितले की तिने कोणालाही पार्सल पाठवलेले नाही. त्यानंतर कॉलरने तिच्या आधार कार्डची माहिती गुन्ह्यात वापरल्याचे सांगितले आणि तिला मुंबई पोलिस अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितले. हा कॉल एका बनावट पोलीस अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करण्यात आला ज्याने सांगितले की तिचे आधार कार्ड एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी जोडले गेले होते ज्याची चौकशी सुरू होती, मात्र वृद्ध महिलेने त्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले. (Digital Arrest)

(हेही वाचा – BMC : महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी ०२ ते १२ डिसेंबर कालावधीत परीक्षा)

त्यानंतर तक्रारदार महिलेला ‘स्काईप ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आणि पोलीस अधिकारी त्याद्वारे तिच्याशी बोलतील असे सांगितले. तिला फोन बंद करू नका आणि केसबद्दल कोणालाही सांगू नका असे आदेश देण्यात आले. आनंद राणा, आयपीएस अधिकारी म्हणून भासवणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या बँक खात्यांची माहिती मागितली. नंतर वित्त विभागातील जॉर्ज मॅथ्यू, आयपीएस असल्याचा दावा करणारा आणखी एक व्यक्ती कॉलवर आली आणि त्यांनी तिला दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले जेणेकरून ते त्याची चौकशी करू शकतील. त्यांनी तिला सांगितले की, “गैरव्यवहार आढळून न आल्याने तिचे पैसे तिला परत केले जातील,” असे एका तोतया पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तिला पोलिसांचा लोगो असलेली बनावट मुंबई गुन्हे शाखेची नोटीसही पाठवली. कॉलरने महिलेला तिचा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल २४x७ सुरू ठेवण्यास सांगितले. (Digital Arrest)

तिने तिच्या घरातील कॉम्प्युटरवर व्हिडिओ कॉल ऑन केला. “जर तक्रारदाराने कॉल डिस्कनेक्ट केला किंवा तो डिस्कनेक्ट झाला, तर आरोपी तिला पुन्हा कॉल करेल आणि तिला पुन्हा कनेक्ट करण्यास सांगेल आणि तिचे लोकेशन तपासत राहील,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर तिला बँकेत जाऊन पैसे हस्तांतरित करण्याची सूचना देण्यात आली आणि बँकेने तिला याची गरज का आहे याची चौकशी केली तर मालमत्ता खरेदी करायची आहे असे सांगण्यात आले. तक्रारदार महिलेने पैसे ट्रान्सफर केले आणि आरोपींनी १५ लाख रुपये तिच्या खात्यात परत केले, हे स्पष्ट झाले. पैसे परत करून त्यांनी तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी तिला तिच्या आणि तिच्या पतीच्या जोड खात्यातील सर्व पैसे पाठवण्यास सांगितले. (Digital Arrest)

(हेही वाचा – BMC : महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी ०२ ते १२ डिसेंबर कालावधीत परीक्षा)

काही कालावधीत तिने सहा बँक खात्यांमध्ये ३ कोटी ८० लाख रुपये ट्रान्सफर केले. तक्रारदाराने तिला तिचे पैसे परत न मिळाल्याने काहीतरी गडबड झाल्याचा संशय येताच तिने तिच्या परदेशात असलेल्या मुलाला फोन केला ज्याने तिला सांगितले की तिची फसवणूक केली जात आहे आणि तात्काळ पोलिसांकडे जाण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने तात्काळ 1930 सायबर हेल्पलाइनवर कॉल करून याबाबत माहिती दिली. दक्षिण सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास अधिकाऱ्यांनी आरोपींची सहा बँक खाती गोठवली असून अधिक तपास पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, निरीक्षक किरण जाधव आणि पीएसआय सचिन त्रिमुखे आणि पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.  (Digital Arrest)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.