राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) मोठ्या उत्साहात पार पडला. तर २३ नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात महायुती (Mahayuti) मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. तर महाविकास आघाडीचा (MVA) चांगलाच ‘सुपडा साफ’ झाला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. तर नवे सरकार स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील, तसेच महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता कमालीची वाढली असून या चर्चांना उधान आलं आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात गुरुवार, शुक्रवारी २२ तासांचा पाणी ब्लॉक)
मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला काय?
भाजपाच्या नेतृत्वातील महायुती शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा करेल. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुळात कोणत्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळणार, याबाबतही अजून संदिग्धता आहे. पाच वर्ष एकाच पक्षाकडे किंवा एकाच नेत्याकडे राहणार की वाटले जाणार, याचा फॉर्म्युलाही ठरलेला नाही.
(हेही वाचा – Digital Arrest चा धक्कादायक प्रकार; वृद्ध महिलेला एक महिना डिजिटल कोठडी)
नव्या मंत्रिमंडळात कुणाला किती जागा?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून (Shivsena MLA) ६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची चिन्हं आहेत. यामध्ये चार कॅबिनेट मंत्री, तर दोन राज्यमंत्रिपदांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ मंत्रिपदं येऊ शकतात. त्यात ३ कॅबिनेट मंत्री, तर एक राज्यमंत्री असण्याचे संकेत मिळत आहेत. (Assembly Election 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community