IPL Mega Auction : आयपीएलमध्ये यंदा परदेशी खेळाडूंना नव्हता भाव, सॅम करनला फक्त साडेतीन कोटी

IPL Mega Auction : काही अनुभवी आणि ज्येष्ठ परदेशी खेळाडूंवर अपेक्षेप्रमाणे बोली लागली नाही.

43
IPL Mega Auction : आयपीएलमध्ये यंदा परदेशी खेळाडूंना नव्हता भाव, सॅम करनला फक्त साडेतीन कोटी
  • ऋजुता लुकतुके

यंदा खेळाडूंच्या खरेदीसाठी सर्व संघ मालकांनी आधीपेक्षा कितीतरी जास्त पैसा ओतला असला आणि ६३९.१५ कोटी रुपयांचा नवीन विक्रम झाला असला तरी अनेकांना मनासारखी रक्कम मिळाली नाही, असंही झालं. खासकरून परदेशा खेळाडूंवर पैसा खर्च करताना संघ मालक काहीसे साशंक दिसले. खेळाडूंच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्या, अनुपलब्घता असे अनुभव कित्येकदा संघ मालकांनी घेतले आहेत. म्हणून असेल कदाचित पण, अगदी फाफ दू प्लेसिस सारख्या खेळाडूलाही खूपच कमी मोबदला मिळाला. असे आधाडीचे पाच खेळाडू बघूया ज्यांना २०२२ मध्ये भरपूर रक्कम मिळाली होती. पण, ती यंदा कमी झाली.

(हेही वाचा – IPL Mega Auction : आयपीएलचा मेगा लिलाव संपला, काय आहे १० संघांचं चित्र)

फाफ दू प्लेसिस – दिल्ली कॅपिटल्स (२ कोटी रु)

फाफ दू प्लेसिसने या हंगामात बंगळुरू संघाचं नेतृत्व केलं होतं. आणि आयपीएलमधील तो सातत्यपूर्ण फलंदाज आहे. पण, यंदा २ कोटी ही त्याची आधारभूत किंमत असताना दिल्ली कॅपिटल्सनी त्याच किमतीवर त्याला विकत घेतलं. इतरांनी दू प्लेसिसमध्ये रस दाखवला नाही.

सॅम करन – चेन्नई सुपर किंग्ज (२.४ कोटी रु)

२०२३ मध्ये सॅम करन सगळ्यात महागडा आयपीएल खेळाडू होता. त्याच्यावर १७ कोटी रुपयांची बोली लागली होती. पण, यावेळी चेन्नई सुपर किंग्जनी त्याला २.४ कोटी रुपयांत विकत घेतलं. त्याची आधारभूत किंमत होती २ कोटी रुपये. सॅम करन हा खरंतर अष्टपैलू म्हणून उपयुक्त खेळाडू आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024: मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार शपथ घेण्याची शक्यता)

लॉकी फर्ग्युसन – पंजाब किंग्ज (२ कोटी रु)

एरवी या लिलावात तेज गोलंदाजांवर उड्या पडल्या. पण, लॉकी फर्ग्युसनला पंजाब किंग्जने २ कोटी या आधारभूत किमतीलाच विकत घेतलं. अचूक आणि वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी ओळखला जातो. आणि काहीवेळा तो एक किंवा दोन षटकांत सामन्याचा नूर पालटवू शकतो. बळी घेण्याच्या क्षमतेसाठी तो ओळखला जातो.

एडन मार्करम – लखनौ सुपर जायंट्स (२ कोटी रु)

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करम भारताविरुद्ध संघाचा कर्णधार होता. पण, आयपीएलमध्ये त्याच्यावर एकदाच बोली लागली. लखनौ संघाने आधारभूत २ कोटी रुपयांवर त्याला विकत घेतलं. मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण यासाठी मार्करम ओळखला जातो.

(हेही वाचा – IPL Mega Auction : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने खरंच वय चोरलंय? लिलावात कोट्यधीश ठरल्यावर पुन्हा टीका सुरू)

रोवमन पॉवेल – कोलकाता नाईट रायडर्स (१.५० कोटी रु)

रोवमन पॉवेल त्याच्या घणाघाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. आणि त्याच्यासाठी फक्त एकाच संघाने बोली लावणं हे मोठं आश्चर्य मानलं जाईल. कोलकाता संघाने त्याला १.५० कोटी रुपयांतच विकत घेतलं. पॉवेल दमदार फलंदाज असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. आणि त्याचा फटका त्याला विंडिज राष्ट्रीय संघातही बसला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.