- ऋजुता लुकतुके
आयपीएल स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून क्रिकेट आणि बॉलिवूड एकत्र आलं असंच तिचं वर्णन केलं गेलं आहे. सामन्यांना सिने तारकांची उपस्थिती, खेळाडूंभोवती तयार झालेलं वलय याबरोबरच बॉलिवूड स्टारनी आयपीएल फ्रँचाईजीमध्ये केलेली गुंतवणूक हे आणखी एक कारण त्या मागे होतं. पंजाब संघाची मालक आहे प्रती झिंटा तर कोलकाता नाईट रायडर्सची मालकी शाहरुख खान आणि जुही चावला यांच्याकडे आहे. शाहरुख खान कोलकाता संघाच्या बऱ्याच सामन्यांना हजर असतो आणि संघाच्या वाटचालीकडे लक्ष ठेवून असतो. (IPL Mega Auction)
तरुण खेळाडूंची निवड आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यातही शाहरुख खान व्यक्तिश: पुढे असतो. रिंकू सिंग हा शाहरुख खानचा शोध म्हणून ओळखला जातो. कोलकाता नाईट रायडर्स आणि शाहरुख खान हे आयपीएलमधील एक समीकरणच तयार झालं आहे. असं असताना आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. कोलकाता फ्रँचाईजी ही शाहरुखची पहिली पसंती नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – महाविकास आघाडीतून फारकत घेण्याचा Uddhav Thackeray यांचा पुनर्विचार?)
फिल्मफेअर या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी म्हणतात, ‘भारतात क्रिकेट आणि सिनेमा दोन्ही विकलं जातं. एवढंच गृहित धरुन चित्रपट ताऱ्यांना मला स्पर्धेशी जोडायचं होतं. शाहरुख आणि मी लहानपणी एक वर्गात होतो. त्या ओळखीवर मी त्याच्याकडे गेलो. त्याला संकल्पना समजावून सांगितली. तू फक्त बरोबर राहा, असं मी त्याला सांगितलं. पुढे काय घडेल हे मलाही तेव्हा माहीत नव्हतं. शाहरुखलाही क्रिकेटविषयी माहिती नव्हती.’ पण, आयपीएलविषयी ऐकताच शाहरुखनेच संघ खरेदीचा प्रस्ताव ठेवला, असं पुढे मोदी सांगतात. (IPL Mega Auction)
‘पण, कोलकाता त्याची पहिली पसंती नव्हती. त्याने बोली लावण्याचं ठरवलं. तेव्हा पहिली पसंती मुंबईला दिली होती. पण, ती फ्रँचाईजी मुकेश अंबानी यांच्याकडे गेली. शाहरुखला दुसरा पर्याय विचारण्यात आला तेव्हा त्याने कोलकाता निवडली. पण, संघ चालवण्याबरोबरच शाहरुखचं खरं योगदान लीगला लोकप्रियता मिळवून देण्यात आहे. त्याने बायका आणि लहान मुलांनाही क्रिकेट सामन्यांसाठी आणलं,’ असं पुढे ललित मोदी म्हणाले. एकदा शाहरुखने पैसे गुंतवल्यावर पुढे दीपिका पदुकोण, अक्षय कुमार यांनीही लीगमध्ये पैसे गुंतवण्याची तयारी दाखवली. हे सगळे बदल शाहरुखपासून सुरू झाले, असं मोदी म्हणाले. यंदा शाहरुख खानची फ्रँचाईजी कोलकाता नाईट रायडर्सने लीगमधील आपलं तिसरं विजेतेपद पटकावलं आहे. (IPL Mega Auction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community