ISRO च्या शुक्रयान मोहिमेला केंद्राची परवानगी; आगामी 2028 मध्ये करणार उपग्रहाचे प्रक्षेपण

24
ISRO च्या शुक्रयान मोहिमेला केंद्राची परवानगी; आगामी 2028 मध्ये करणार उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शुक्रयान उपग्रह मोहिमेला मंगळवारी (२६ नोव्हेंबर) केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली. इस्रोचे संचालक देसाई म्हणाले की, शुक्रयान या व्हीनस ऑर्बिटिंग उपग्रह प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आगामी 2028 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चांद्रयान-4 संदर्भात देसाईंनी सांगितले की, चांद्रयान-3 चा पाठपुरावा म्हणून चांद्रयान-4 ची कल्पना मांडण्यात आली आहे, जिथे आपण केवळ चंद्रावरच उतरणार नाही. तर चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने घेऊनही परत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चांद्रयान-4 बाबत, इस्रोचे (ISRO) संचालक देसाई यांनी भारत आणि जपान यांच्यातील सहयोगी मोहिमेची योजनाही उघडही केली आहे. चांद्रयान-4 मध्ये 2 मोहिमा असतील. भारत आणि जपान एक संयुक्त मोहीम राबवणार आहेत जिथे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या टोकाला 90 अंश दक्षिणेकडे जाईल आणि 69.3 अंश दक्षिणेकडे गेलेल्या आमच्या शेवटच्या प्रयत्नाच्या तुलनेत ते अचूक लँडिंग करेल. या मोहिमेचा एक भाग म्हणून रोव्हरचे वजन 350 किलो असेल. आम्हाला सरकारची परवानगी मिळाली तर आम्ही 2030 पर्यंत हे मिशन पूर्ण करू शकू असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Assembly Election Results 2024 : राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा)

व्हीनस ऑर्बिटर मिशन (व्हीओएम) हे भारताचे शुक्रावरील मिशन आहे. त्याचा उद्देश शुक्राचे वातावरण, पृष्ठभाग आणि सूर्यासोबत त्यावर होणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करणे हा आहे. या मोहिमेद्वारे इस्रो (ISRO) शुक्र ग्रह समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इस्त्रोने 28 मार्च 2028 रोजी व्हीनस ऑर्बिटर मिशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मिशनमध्ये 19 पेलोडचा समावेश असेल. यापैकी 16 पेलोड भारतीय असतील, दोन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहयोगी पेलोड असतील आणि एक आंतरराष्ट्रीय पेलोड असेल.

व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी 1,236 कोटी रुपये खर्च येणार असून हे अभियान 5 वर्षे चालणार आहे. या मोहिमेद्वारे शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि भूपृष्ठाचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच शुक्राच्या वातावरणातील प्रक्रिया आणि रचनेचे विश्लेषण केले जाईल. शुक्राचे आयनोस्फियर आणि त्याची गतिशीलता तपासली जाईल. यासोबतच सौर किरणोत्सर्गासह शुक्राचा परस्परसंवाद तपासला जाईल. त्याचप्रमाणे शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील उत्क्रांतीविषयक फरक समजण्यासाठी संशोधन केले जाणार आहे. (ISRO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.