स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!

55
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!
  • खास प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राज्यातील जनतेने साफ नाकारले. राहुल गांधी यांनी राज्यात ७ जाहीर सभा घेऊनही १०३ जागा लढूनही केवळ १६ जागी उमेदवार निवडून दिले. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि अन्य महापालिका निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचाराला महाराष्ट्रात तर येणार नाही ना? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे.

मोदींना खोचक टोला

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाले. त्याने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे यश मिळाल्याचा खोचक टोला हाणाला होता. तसेच विधानसभेला मोदी यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्या असे आवाहनही शरद पवार यांनी केले होते. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – IPL Mega Auction : डेव्हिड वॉर्नर ते पृथ्वी शॉ, लिलावात बोली न लागलेले खेळाडू पाहूया)

मोदींच्या ९ सभा, माविआ जमीनदोस्त

मोदी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या केवळ ९ सभा घेतल्या आणि महाविकास आघाडी सपशेल झोपली. शिवसेना उबाठाला लोकसभेला ९ जागी यश देणाऱ्या जनतेने विधानसभेला उबाठाला २० जागाच देऊ केल्या. काँग्रेसला लोकसभेला १४ खासदार निवडून देणाऱ्या जनतेने विधानसभेला काँग्रेससाठी केवळ २ अधिक म्हणजे १६ जागा दिल्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही जागा देण्यात जनतेने उदारता दाखवत लोकसभेपेक्षा २ अधिकच्या जागा विधानसभेत दिल्या. राज्यातील मतदारांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे ८ खासदार निवडून दिले आणि विधानसभेला १० आमदार. राज्यात विरोधी पक्ष नेता बसावा इतक्या जागाही विरोधी पक्षाला लोकांनी दिल्या नाहीत.

राहुलच्या सात सभा, १६ जागा

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राज्यात सात जाहीर सभा संबोधित केल्या. त्यांची बहीण प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही तीन सभा घेतल्या. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ९ सभा घेतल्या. तरी काँग्रेसच्या विधानसभेला केवळ १६ जागा निवडून आल्या.

(हेही वाचा – Assembly Election Results 2024 : राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा)

एकही सभा नाही, ४४ जागा

विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष केले होते, तेव्हा काँग्रेसचे फारसा काही प्रचार न करता ४४ आमदार निवडून आले होते. याचा अर्थ महाराष्ट्राने राहुल गांधी यांना नाकारले किंवा राहुल गांधी यांना राज्यातील जनता गांभीर्याने घेत नाही, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.