आता गांधीगिरी नाही, तर आक्रमकता दाखवणार! नियम शिथिलतेसाठी व्यापारी संतप्त 

मागण्या मान्य न झाल्यास, शनिवार आणि रविवारीसुद्धा दुकाने उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला.

123

मुंबईत विशिष्ट भागात सर्रास दुकाने उघडी असतात, त्यांना कुणी जाब विचारात नाही आणि आमच्यावर मात्र कायद्याचा बडगा उगारला जातो, हे आता आम्ही सहन करणार नाही, व्यापारी गांधीगिरी सोडून आक्रमक पवित्रा घेणार आहेत, असा इशारा दादर येथील व्यापाऱ्यांनी दिला.

मुंबईत विशिष्ट भागात दुकाने सर्रास उघडी!

दादर येथे व्यापाऱ्यांनी सोमवारी, १२ जुलै रोजी रस्त्यावर उतरून महापालिका आणि पोलिस यांच्या विरोधात निदर्शने केले. मागण्या मान्य न झाल्यास, शनिवार आणि रविवारीसुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला. नियमांमध्ये शिथिलता मिळत नसल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. नियमांमध्ये शिथिलता न आल्यास मतदानाच्या वेळी दाखवून देऊ, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने दुकानांबाबत लादलेल्या निर्बंधांमुळे दादर व्यापारी संघ आक्रमक झाला आहे. शनिवार-रविवार अनेकांना सुट्टी असताना ज्या दिवशी लोक खरेदीला येतात. त्याच दिवशी दुकान बंद असल्याने याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे. शिवाय, सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने ही वेळ 7 ते 7 तरी किमान वाढवून द्यावी, अशी मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे. अनेकदा म्हणणे मांडून सुद्धा जर सरकार ऐकत नसेल तर नियम मोडून शनिवार-रविवारी दुकान उघडी ठेवल्या शिवाय पर्याय नाही, आता गांधीगिरी सोडून आक्रमकपणा आत्मसात करणार आहे. कारण मुंबईत विशिष्ट भागात दुकाने सर्रासपणे सुरु असतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण आमच्यावर कायद्याचा बडगा उगारा जात आहे, हे चुकीचे आहे, असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे.

(हेही वाचा : निष्ठेचे फुटलेले उमाळे, पण…)

कोल्हापुरातही व्यापारी आक्रमक! 

कोल्हापुरातील व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाच दिवसांची मुदत दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मात्र व्यापाऱ्यांच्या काही संघटना दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. पाच दिवसांमध्ये कोल्हापूर शहरात पॉझिटीव्हीटी रेट वाढला नाही, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.