DPIIT आणि विन्‍झोने भारतातील परस्‍परसंवादी मनोरंजन इकोसिस्‍टमला चालना देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर केली स्‍वाक्षरी

31
DPIIT आणि विन्‍झोने भारतातील परस्‍परसंवादी मनोरंजन इकोसिस्‍टमला चालना देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर केली स्‍वाक्षरी
DPIIT आणि विन्‍झोने भारतातील परस्‍परसंवादी मनोरंजन इकोसिस्‍टमला चालना देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर केली स्‍वाक्षरी

•डीपीआयआयटीने (DPIIT) २,००० हून अधिक परस्‍परसंवादी मनोरंजन स्‍टार्टअप्‍स, विद्यार्थी, प्रभावकांना मेन्‍टोरशीप, वर्कशॉप्‍स, हॅकेथॉन्‍स आणि अॅक्‍सेलरेटर प्रोग्राम्‍सच्‍या माध्‍यमातून पाठिंबा देण्‍यासाठी विन्‍झोसाबत दोन वर्षाच्‍या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली, ज्‍याचा ३०० बिलियन डॉलर्स जागतिक गेमिंग बाजारपेठेत भारताचा जागतिक शेअर वाढवण्‍याचा मनसुबा आहे.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!)

•या सामंजस्‍य कराराचा भाग म्‍हणून विन्‍झो डीपीआयआयटीसोबत (DPIIT) सहयोगाने सेंटर ऑफ एक्‍सलन्‍स (सीओई)ची स्‍थापना करणार, जे ऑनलाइन गेमिंगमध्‍ये स्‍टार्टअप्‍सच्‍या विकासाला चालना देण्‍याच्‍या पंतप्रधान मोदी यांच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न असलेले उच्‍च-कुशल, उद्योग-सुसज्‍ज कर्मचारीवर्ग घडवणार. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची उपस्थिती वाढवण्‍यास मदत होईल, तसेच भारतीय गेमिंग मालमत्तांच्‍या मॉनेटायझेशनमध्‍ये नाविन्‍यतेला चालना मिळेल, निर्यातीसाठी ‘मेड इन इंडिया’ बौद्धिक मालमत्ता विकसित होईल आणि एफडीआयमध्‍ये विकासाला गती मिळेल.

नोव्‍हेंबर २६, २०२४: जागतिक गेमिंग उद्योगामध्‍ये भारताच्‍या स्‍थानाला नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज असलेल्‍या मोठ्या विकासासह डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्‍ट्री अँड इंटर्नल ट्रेड (DPIIT) ने भारतातील सर्वात मोठा सोशल गेमिंग व परस्‍परसंवादी मनोरंजन प्‍लॅटफॉर्म विन्झोसोबत धोरणात्‍मक सहयोग केला आहे. या दोन वर्षांच्‍या सामंजस्‍य कराराचा (एमओयू) नाविन्‍यतेला चालना देत, कुशल टॅलेंट घडवत आणि जागतिक मंचावर स्‍पर्धा करण्‍यास स्‍टार्टअप्‍सना सक्षम करत भारतातील परस्‍परसंवादी मनोरंजन क्षेत्राच्‍या विकासाला गती देण्‍याचा मनसुबा आहे.

हा अद्वितीय सहयोग २,००० हून अधिक स्‍टार्टअप्‍स, इनोव्‍हेटर्स व विद्यार्थ्‍यांची प्रबळ इकोसिस्‍टम निर्माण करण्‍यावर, तसेच त्‍यांना मार्गदर्शन, उद्योगाबाबत माहिती आणि जागतिक संधी देण्‍यावर लक्ष केंद्रित करेल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या गेमिंग व तंत्रज्ञानामधील आत्‍मनिर्भर भारत दृष्टिकोनाशी संलग्‍न राहत हा उपक्रम भारताला परस्‍परसंवादी मनोरंजनामधील जागतिक लीडर म्‍हणून स्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न करतो, जो ३०० बिलियन डॉलर्स जागतिक गेमिंग बाजारपेठेचा बहुतांश शेअर कॅप्‍चर करेल. (DPIIT)

या सहयोगाची खासियत म्‍हणजे डीपीआयआयटीसोबत (DPIIT) सहयोगाने विन्‍झोकडून स्‍थापना करण्‍यात येणारे सेंटर ऑफ एक्‍सलन्‍स (सीओई). सीओई स्‍टार्टअप्‍स व उद्योजकांसाठी लाँचपॅड म्‍हणून सेवा देईल, जेथे कुशल, उद्योग-सुसज्‍ज कर्मचारीवर्ग घडवणे, भारतीय गेमिंग मालमत्तांसाठी मॉनेटायझेशन धोरणांमध्‍ये नाविन्‍यता आणणे, जागतिक दर्जाच्‍या बाजारपेठांसाठी ‘मेड इन इंडिया’ बौद्धिक मालमत्ता विकसित करणे, फॉरेन डायरेक्‍ट इन्‍व्‍हेस्‍टमेंट (एफडीआय) आकर्षित करणे आणि भारतात परस्‍परसंवादी तंत्रज्ञान उत्‍पादनांच्‍या उत्‍पादनाला गती देणे अशा महत्त्वपूर्ण पैलूंवर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. मॉनेटायझेशन व टॅलेंटमधील तफावत अशा दीर्घकालीन आव्‍हानांचे निराकरण करत सीओई भारतातील गेमिंग व परस्‍परंसवादी मनोरंजन क्षेत्राच्‍या भविष्‍याला नवीन आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

अलिकडील यूएसआयएसपीएफ (US-India Strategic Partnership Forum) अहवालानुसार, भारतातील परस्‍परसंवादी मनोरंजन क्षेत्र २०३४ पर्यंत ६० बिलियन डॉलर्सपर्यंत विकसित होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे २ दशलक्षहून अधिक रोजगार निर्माण होतील. डीपीआयआयटी-विन्‍झो सहयोग स्‍टार्टअप्‍सना हॅकेथॉन्‍स, वर्कशॉप्‍स, अॅक्‍सेलेरेटर प्रोग्राम्‍स आणि क्‍यूरेटेड पिच इव्‍हेण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून निपुण करत या क्षमतेचा फायदा घेण्‍यासाठी करण्‍यात आला आहे.

तसेच, हा सामंजस्‍य करार विन्‍झोचा भारतातील टॉप गेम डेव्‍हलपर्सना ओळखण्‍यासाठी व मार्गदर्शन करण्‍यासाठी प्रमुख प्‍लॅटफॉर्म टेक ट्रायम्‍फ प्रोग्राम (भारत एडिशन)चा विस्‍तार करेल. या प्रोग्रामने आधीच जागतिक फोरम्सवर गेम डेव्‍हलपर्स कॉन्‍फरन्‍स (जीडीसी) व गेम्‍सकॉम लॅटम अशा भारतातील गेमिंग टॅलेंटला दाखवले आहे आणि आता डीपीआयआयटीच्‍या पाठिंब्‍याच्‍या माध्‍यमातून आपल्‍या प्रभावामध्‍ये अधिक वाढ करेल.

डीपीआयआयटीचे सहसचिव श्री. संजीव सिंग म्‍हणाले, “हा सहयोग उत्‍पादक व निर्यातदार म्‍हणून भारताच्‍या क्षमतेमध्‍ये वाढ करण्‍यामधील मोठा टप्‍पा आहे. विन्‍झोसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा नाविन्‍यतेला चालना देण्‍याचा, उद्योजकतेचा प्रसार करण्‍याचा आणि स्‍टार्टअप्‍सना जागतिक दर्जाची उत्‍पादने उत्‍पादित करण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम भारताला परस्‍परसंवादी तंत्रज्ञानामध्‍ये लीडर बनवण्‍याच्‍या, तसेच पंतप्रधान मोदी यांच्‍या आत्‍मनिर्भर भारत दृष्टिकोनाप्रती अर्थपूर्ण योगदान देण्‍याच्‍या आमच्‍या ध्‍येयाशी संलग्‍न आहे.’’

हा सामंजस्‍य करार व्‍यावसायिकांना कोडिंग, अॅनिमेशन, गेम डिझाइन व डेव्‍हलपमेंटमधील अत्‍याधुनिक कौशल्‍यांसह सुसज्‍ज करत क्षेत्रातील टॅलेंट तफावत दूर करण्‍यावर देखील लक्ष केंद्रित करतो. सीओई स्‍टार्टअप्‍सना परस्‍परसंवादी मनोरंजन उद्यम, उद्योग प्रमुखांकडून मार्गदर्शन आणि गुंतवणूकदारांसोबत प्रत्‍यक्ष संबंध स्‍थापित करण्‍यासाठी विन्‍झोचा ५० दशलक्ष डॉलर्स फंड मिळवण्‍याची संधी देईल.

डीपीआयआयटीचे संचालक (सटार्टअप इंडिया) डॉ. सुमीत कुमार जारंगल (Dr. Sumeet Kumar Jarangal) म्‍हणाले, “या उपक्रमामधून उद्योग सहयोगींसोबत सहयोग करत उद्योजकांसाठी प्रगतीशील इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. संसाधने, मार्गदर्शन व जागतिक एक्‍स्‍पोजर देत आम्‍ही स्‍टार्टअप्‍स निर्माण करण्‍यासोबत टॅलेंट व इनोव्‍हेशनची पाइपलाइन देखील तयार करत आहोत, जी भारताला जागतिक गेमिंग उद्योगामध्‍ये अग्रस्‍थानी घेऊन जाईल.’’

विन्‍झोच्‍या सह-संस्‍थापक सौम्‍या सिंग राठोड म्‍हणाल्‍या, “आम्‍हाला डीपीआयआयटीसोबत सहयोग करण्‍याने सन्‍माननीय वाटत आहे, जे आमच्‍या सारख्‍या उद्योजकांना भारतातून जागतिक स्‍तरावर जाण्‍याचे स्‍वप्‍न पाहण्‍यास, घडवण्‍यास आणि मोठ्या प्रमाणात प्रगती करण्‍यास सक्षम करण्‍यामध्‍ये आधारस्‍तंभ आहे. हे सामंजस्‍य करार इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याच्‍या दिशेने परिवर्तनात्‍मक पाऊल आहे, जी भारतासाठी इनोव्‍हेशनला चालना देईल, तसेच भारतीय उत्‍पादने व बौद्धिक मालमत्तेला जागतिक मंचावर देखील घेऊन जाईल. फॉरेन डायरेक्‍ट इन्‍व्‍हेस्‍टमेंट वाढवत, जागतिक दर्जाच्‍या टॅलेंटला निपुण करत आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज आयपी निर्मितीला चालना देत आम्‍ही परस्‍परसंवादी मनोरंजनाच्‍या नवीन युगासाठी पाया रचत आहोत. स्‍टार्टअप महाकुंभदरम्‍यान माननीय पंतप्रधानांच्‍या आवाहनामधून प्रे‍रणा घेत आम्‍ही भारताला गेमिंग व तंत्रज्ञान इनोव्‍हेशनमध्‍ये जागतिक लीडर बनवण्‍याच्‍या आमच्‍या संकल्‍पाशी कटिबद्ध आहोत.’’

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.