मुख्यमंत्रीपदापेक्षा मुंबई, ठाणेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे Eknath Shinde यांचे स्वप्न

113
मुख्यमंत्रीपदापेक्षा मुंबई, ठाणेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे Eknath Shinde यांचे स्वप्न
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावरून तर्क वितर्क लढवले जात असले तरी आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही याची पूर्ण कल्पना असल्याने एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत भुषवलेल्या या पदाबाबत समाधान आपल्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केले. त्यामुळे आपण स्वत: मुख्यमंत्री पदाचा शर्यतीत नसून दिले तर नक्कीच विचार केला जाईल या विचाराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी युतीचा जो मुख्यमंत्री होईल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद महत्वाचे नसून येणाऱ्या मुंबई, ठाणेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वत:च्या पक्षासह महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे हेच प्रमुख उद्दिष्ट शिंदे यांचे असल्याचे बोलले जाते.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!)

विधानसभा निवडणुकीत मागील वेळी १०५ आमदार असतानाही केवळ ४० आमदार असलेल्या माझ्यासारख्या सर्वसाधारण आमदाराला भाजपाने मुख्यमंत्री केले आणि अडीच वर्षांच्या कालावधीत या पदाला आपण न्याय देवू शकलो नाही तर एक चांगला मुख्यमंत्री म्हणून जनतेत छाप पाडून घेतली. त्यामुळे आता भाजपाचे १३२ आमदार निवडून आल्याने त्यावर आपण मुख्यमंत्रीपदाचा दावा करणे योग्य नाही. जो कालावधी मिळाला त्यात मी समाधानी असून युतीचा मुख्यमंत्री होतोय याचाच अधिक आनंद असल्याच्या भावना मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केल्या जात आहेत. हे खरे आहे की ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असेल असे आमच्या महायुतीत ठरलेले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्याप्रमाणेच आपण महायुतीचे काम करणार असल्याचे शिंदे (Eknath Shinde) यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Congress आखतेय मोठा डाव, माजी राजदूताचा खळबळजनक दावा)

आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटणे स्वाभाविक असले तरी शिवसेना पक्षाचा मुख्यनेता म्हणून जो निर्णय युतीच्या भल्याचा असेल तोच आम्ही घेणार आम्ही. राज्याला बळकट आणि मजबूत सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमच्यात मुख्यमंत्री पदामध्ये चढाओढ नाही, त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून ज्याप्रकारे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका लढल्या, त्याचप्रमाणे मुंबई आणि ठाण्यासह स्थानिक स्वराज संस्थेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न राहील,असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सहकारी आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगून महायुती अधिक मजबूत करण्यासाठी महापालिका, नगररपालिकांच्या निवडणुकींच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्याची माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजिकच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.