- सुजित महामुलकर
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने धूळ चारली, त्याचा राग प्रस्थापित महाविकास आघाडीचे नेते दूध उत्पादकांवर काढत आहेत. आघाडीच्या नेत्यांच्या ताब्यातील दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खरेदी दर कमी करून त्यांचे रोजचे ५ कोटीचे नुकसान केले आहे. राज्य सरकारने अशा दूध संघांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केली आहे. (MVA)
(हेही वाचा – ISRO च्या शुक्रयान मोहिमेला केंद्राची परवानगी; आगामी 2028 मध्ये करणार उपग्रहाचे प्रक्षेपण)
निवडणूक खर्च भरपाई
महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) गटाच्या नेत्यांनी निवडणुकीत झालेला खर्च भरून काढण्यासाठी व पराभवाचा राग काढण्यासाठी आपापल्या ताब्यातील दूध संघातील खरेदी दर ३ रुपयांनी कमी केले आहेत. राज्यात राजारामबापू दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नेते जयंत पाटील यांचे वर्चस्व असून, कोयना दूध संघ उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या ताब्यात आहे. गोकुळ दूध संघावर सतेज उर्फ बंटी पाटील, शिवामृत दूध संघावर मोहिते पाटील, सोनई दूध संघात प्रविण माने आणि राजहंस दूध संघावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. (MVA)
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!)
दूध दर ३५ वरून ३२ रुपये
“हे आघाडीचे नेते कालही शेतकरीद्रोही होते व आजही शेतकरीद्रोहीच आहेत. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारा ३५ रुपये लिटर खरेदी दर कमी करून ३२ रुपये केला. निवडणुकीत जनतेने आघाडीला नाकारले, त्याचा हा परिणाम असून राज्य सारकारने याची दाखल घेऊन या दूध संघांवर तत्काल कारवाई करावी,” अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केली. (MVA)
(हेही वाचा – Congress आखतेय मोठा डाव, माजी राजदूताचा खळबळजनक दावा)
महायुतीला घरचा आहेर
खोत यांचा पक्ष रयत क्रांती संघटना हा महायुतीचा घटक पक्ष आहे. खोत पुढे म्हणाले, “राज्य सरकारने दुग्धविकास खाते वेगळे केले असले तरी त्यासाठी स्वतंत्र मंत्री देण्याची गरज आहे. जो माणूस कधी शेताच्या बांधावर गेला नाही असा कृषि मंत्री होतो तर ज्याने कधी गुरांचा गोठा पाहिला नाही, शेण काढलं नाही असा दुग्धविकास मंत्री होतो. किमान शेतकाऱ्यांशी संबंधित खात्याला तरी प्रस्थापित नाही, विस्थापित समुदायातून आलेल्या व्यक्तीला मंत्रीपद द्यावे,” असे म्हणत खोत यांनी महायुतीलाही घरचा आहेर दिला. (MVA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community