- खास प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूक झाली. नव्या विधानसभेत कोण सगळ्यात श्रीमंत आमदार आहे आणि कोण सगळ्यात गरीब, हे माहीत आहे का? (Assembly Election 2024)
२८८ पैकी २३० जागी महायुती
राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी ३,२३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. २८८ पैकी २३० जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीलय ५० चा आकडाही गाठता आला नाही. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule यांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले…)
संपत्ती तब्बल ३,३८३ कोटी रु
या २८८ नवनिर्वाचित आमदारांमध्ये सगळ्यात श्रीमंत आमदार मुंबईच्या उपनगरातील आहे. घाटकोपर पूर्वचे भाजपाचे पराग शाह यांची संपत्ती तब्बल ३,३८३ कोटी रुपये आहे, त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर रायगड जिल्ह्यातील पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर हे आहेत. त्यांची मालमत्ता ४७५ कोटी रुपये आहे तर ४४७ कोटी मालमत्तेसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत भाजपाचेच मलबार हिलचे मंगल प्रभात लोढा. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Disaster Relief Fund : महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून 1000 कोटींचा निधी मंजूर)
आमदाराची संपत्ती ९ लाख
याउलट सगळ्यात गरीब तीन आमदारांमध्ये पहिल्या स्थानी काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद पठाण असून त्यांची मालमत्ता केवळ ९ लाख रुपये आहे. तर दुसऱ्या स्थानी वाशिमचे भाजपा आमदार श्याम खोडे हे असून त्यांची संपत्ती ३१ लाखांच्या घरात आहे आणि तिसऱ्या स्थानी भाजपाचेच चर्चेतील आमदार गोपीचंद पडळकर असून त्यांची संपत्ती ६५ लाख रुपये आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २८६ विजयी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषणातून देण्यात आली. (Assembly Election 2024)
संपत्ती ४४७ कोटी; कर्ज ३०६ कोटी
भाजपाचे मंगल प्रभात लोढा यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक श्रीमंतांच्या पहिल्या तीन आणि सर्वाधिक दायित्व (liability) असलेल्यांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये त्यांचे नाव आहे. श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असले तरी सर्वाधिक दायित्व यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. लोढा यांच्यावर ३०६ कोटी रुपये कर्ज आहे. दुसऱ्या स्थानी शिवसेनेचे ओवळा माजिवाडाचे प्रताप सरनाईक असून त्यांच्यावर १९९ कोटी रुपये दायित्व आहे आणि तिसऱ्या स्थानी काँग्रेसचे जत मतदारसंघाचे आमदार विश्वजीत पतंगराव कदम असून त्यांचे दायित्व ११५ कोटी रुपये आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community