आता Rajya Sabha च्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

68

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता लागलीच राज्यसभेच्या (Rajya Sabha) ६ रिक्त जागांवरील निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्याची अधिसूचना मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली.

या अधिसूचनेनुसार ही निवडणूक २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे . भारताच्या निवडणूक आयोगाने ही अधिसूचना जारी केली. २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेच्या (Rajya Sabha) सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो, परंतु लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. राज्यसभा, संसदेचे वरचे सभागृह कधीही विसर्जित होत नाही, परंतु लोकसभा विसर्जित केली जाऊ शकते. रिक्त ६ जागांपैकी आंध्र प्रदेशच्या तीन जागांचा समावेश आहे. तर पश्चिम बंगाल, हरियाणा आणि ओडिशामधील प्रत्येकी एका जागा आहे.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!)

सध्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) एकूण 250 जागा आहेत. त्यापैकी 238 जागांसाठी अप्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. तर 12 सदस्य भारताचे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. लोकसभेच्या 445 जागांपैकी 443 जागांची निवड सार्वजनिक मताद्वारे केली जाते, तर दोन जागांसाठी सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.