Sambhal Violence नंतरही मुजफ्फरनगरमध्ये घरांच्या छतांवर दगडविटांची रास; पोलिस अर्लट मोडवर

51
Sambhal Violence नंतर पोलिस अर्लट मोडवर; मुजफ्फरनगरमध्ये घराच्या छतांवर दगडविटांची रास
Sambhal Violence नंतर पोलिस अर्लट मोडवर; मुजफ्फरनगरमध्ये घराच्या छतांवर दगडविटांची रास

संभलमध्ये (Sambhal Violence) दि.२४ नोव्हेंबर रोजी धर्मांध जमावाच्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिस अलर्ट झाली आहे. तसेच अनेक जिल्ह्यात प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. अमेठी आणि मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील घराच्या छतांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. यामध्ये मुजफ्फरनगरमधील अनेक घराच्या छतावर दगडविटा ठेवण्यात आल्या होत्या. अमेठी प्रशासनाने लोकांना ताकीद दिली आहे की, जर कुणाच्या घराच्या छतावर अनावश्यक सामान दिसले तर त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. (Sambhal Violence)

( हेही वाचा : संविधानाने सर्वांना विकासाचा रस्ता दाखवला; PM Narendra Modi यांचे संविधान दिनानिमित्त गौरवउद्गार

वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने मुस्लिमबहुल भागात घराच्या छतांची तपासणी केली. यादरम्यान ७ घराच्या छतावर दगडविटा सापडल्या. प्रशासनाने तत्काळ दगडविटा हटवल्या असून गुप्त विभागाला यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. त्यानंतर पोलिसांचे पथक मुस्लिमबहुल परिसरात तपास करत आहे. तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत आहे. पोलिसांच्या पथकाने खालापार आणि न्याजपुरा या मुस्लिमबहुल परिसरात निगराणी ठेवण्यात सुरुवात केली आहे. पोलिसांनी मुस्लिम समाजातील प्रतिनिधींची मुलाखत घेतली आहे. तसेच जिल्ह्यात शांतता बनवण्यास सांगितले आहे. (Sambhal Violence)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.