Mumbai Cold Weather: महाराष्ट्रात थंडी वाढली! मुंबई-पुण्यात पारा घसरला

56
Mumbai Cold Weather: महाराष्ट्रात थंडी वाढली! मुंबई-पुण्यात पारा घसरला
Mumbai Cold Weather: महाराष्ट्रात थंडी वाढली! मुंबई-पुण्यात पारा घसरला

महाराष्ट्रात थंडीची (Mumbai Cold Weather) तीव्रता हळूहळू वाढत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागात तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) संपूर्ण राज्यात थंडी वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. (Mumbai Cold Weather)

(हेही वाचा- आता Rajya Sabha च्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर)

पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. कमाल तापमानातही घसरण झाली असून, त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Mumbai Cold Weather)

(हेही वाचा- Devendra Fadnavis यांनाच मुख्यमंत्री करा; महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाची रक्ताने पत्र लिहत मागणी)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील सांताक्रूझचे तापमान 16.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर पुण्यात किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे, जे या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. (Mumbai Cold Weather)

काय म्हणाले आयएमडी?
हवामान खात्याचे म्हणणे आहे की, उत्तर आणि उत्तर-पश्चिमी वाऱ्यांची उपस्थिती आणि आकाशातील निरभ्र वातावरण सध्याच्या तापमानातील घसरणीला कारणीभूत आहे, ज्यामुळे जमीन वेगाने थंड होत आहे. सध्याचे तापमान पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. दिवसाचे तापमान वाढले असले तरी रात्री थंडीत झपाट्याने वाढ झाल्याने थंडी वाढली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.