Western Railway AC Local Trains: पश्चिम रेल्वेवर नव्या १३ एसी लोकल फेऱ्या; ‘असे’ आहे नियोजन

41
Western Railway AC Local Trains: पश्चिम रेल्वेवर नव्या १३ एसी लोकल फेऱ्या; 'असे' आहे नियोजन
Western Railway AC Local Trains: पश्चिम रेल्वेवर नव्या १३ एसी लोकल फेऱ्या; 'असे' आहे नियोजन

लोकल सेवा (Western Railway AC Local Trains) ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. रोज लाखो मुंबईकर कामानिमित्तानं लोकलमधून प्रवास करत असतात. वेस्टर्न (Western Railway) , सेंट्रल आणि हार्बर या तीन मार्गांप्रमाणेच ट्रान्स हार्बरनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची ही गरज लक्षात घेऊन या मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेवर (Central Railway) एसी लोकलही (AC local) सुरु करण्यात आल्या आहेत. या एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवाशाच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेनं 13 नव्या एसी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. (Western Railway AC Local Trains)

फेऱ्यांची एकूण संख्या १०९ वर
बुधवारपासून (27 नोव्हेंबर, 2024) या एसी लोकल सुरु होणार आहेत. मुंबई उपनगरी विभागात नव्या १३ एसी लोकल सुरू झाल्यानंतर दिवसांत, अर्थात सोमवार ते शुक्रवारदरम्यान धावणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या १०९वर पोहोचणार आहे. सुट्टीदिवशी अर्थात शनिवारी-रविवारी ६५ फेऱ्या धावणार सामान्य लोकल फेऱ्यांच्या जागी धावणार आहेत. यामुळे एकूण एक हजार ४०६ लोकलफेऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. (Western Railway AC Local Trains)

‘असे’ आहे नियोजन
नव्या १३ वातानुकूलित फेऱ्यांपैकी ६अप आणि ७डाऊन अशा धावतील. अप अर्थात विरार-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेटदरम्यान प्रत्येकी दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. विरार-वांद्रे आणि भाईंदर अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी वाढवण्यात आली आहे. डाऊन अर्थात चर्चगेट-विरारदरम्यान दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. चर्चगेट-अंधेरी, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक फेरी वाढवण्यात आली आहे. अंधेरी, वांद्रे, भाईंदरकरांना दिलासा विरारहून येणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. याचे तिकीट-पास असलेल्या प्रवाशांना डब्यात प्रवेश करता येत नाही. अंधेरी, भाईंदर, वांद्रेतून वातानुकूलित लोकल सुरू झाल्याने येथून प्रवास सुरू करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Western Railway AC Local Trains)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.