Bangladesh मध्ये इस्कॉनचे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांचा गंभीर हल्ला; ५० आंदोलक जखमी

39
Bangladesh मध्ये इस्कॉनचे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांचा गंभीर हल्ला; ५० आंदोलक जखमी
Bangladesh मध्ये इस्कॉनचे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांचा गंभीर हल्ला; ५० आंदोलक जखमी

बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे (ISKCON) सदस्य चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यानंतर ढाका, चिटगाव, दिनाजपूर आदी ठिकाणी हिंदूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. ढाक्यातील शाहबागमध्ये आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी हल्ला केला. यात ५० हून अधिक हिंदू जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना शाहबाग पोलीस ठाण्यापासून केवळ ३० मीटर अंतरावर घडली. पोलीस आणि प्रशासन यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी धर्मांधांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. यावरून बांगलादेशातील (Bangladesh) पोलीस धर्मांध मुसलमानांच्या हल्ल्यांचे समर्थन करत असल्याचे दिसून आले.

(हेही वाचा – Mumbai Cold Weather: महाराष्ट्रात थंडी वाढली! मुंबई-पुण्यात पारा घसरला)

काय आहे प्रकरण ?

‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ (Bangladesh National Party) आणि जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami) या पक्षांच्या धर्मांध मुसलमान कार्यकर्त्यांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. चितगाव येथे २५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा सहस्रो हिंदूंनी जय सिया राम आणि हर हर महादेव अशा घोषणा देत मौलवी बाजारमध्ये मशाल मोर्चा काढला. हिंदूंकडून प्रत्येक जिल्ह्यात शांती सभांचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेवर धर्मांधांनी आक्रमण केले.

चितगाव विश्‍वविद्यालयाचे प्रा. कुशाल बरन यांच्यावरही मोठा हल्ला करण्यात आला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

बांगलादेशातील सत्तासंघर्षाच्या काळात ६ ऑगस्ट या दिवशी खुलना जिल्ह्यातील इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये भगवान जगन्नाथाच्या मूर्तींचे दहन करण्यात आले. या आक्रमणानंतर चिन्मय दास यांनी चितगावमधील इतर ३ मंदिरांनाही धोका असल्याचे सांगितले होते. त्यांच्या संरक्षणासाठी हिंदू समाजाला एकत्रित करण्याचे काम ते करत होते. दास म्हणाले होते की, हिंसाचारापासून वाचण्यासाठी हिंदू त्रिपुरा आणि बंगाल येथे आश्रय घेत आहेत.

४. बांगलादेशात इस्कॉनची ७७ मंदिरे आहेत. बांगलादेशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात इस्कॉनचे मंदिर असून अनुमाने ५० हजारहून अधिक लोक त्यांच्याशी संबंधित आहेत.

न्यायालयाने फेटाळला जामीन

चिन्मय प्रभु यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. बांगलादेश पोलिसांनी चिन्मय प्रभु यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. कारागृहात त्यांना सर्व धार्मिक लाभ दिले जावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (Bangladesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.