Border – Gavaskar Trophy 2024 : शुभमन गिल ॲडलेड कसोटीलाही मुकणार? 

Border - Gavaskar Trophy 2024 : पहिल्या कसोटीपूर्वी सरावादरम्यान शुभमन गिलचं हाताचं बोट दुखावलं होतं

44
Border - Gavaskar Trophy 2024 : शुभमन गिल ॲडलेड कसोटीलाही मुकणार? 
Border - Gavaskar Trophy 2024 : शुभमन गिल ॲडलेड कसोटीलाही मुकणार? 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल दुसऱ्या ॲडलेड कसोटीतही खेळेल की नाही याविषयी अनिश्चितता आहे. पहिल्या कसोटीपूर्वी सिम्युलेशन सराव करताना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुभमनच्या हाताच्या बोटावर चेंडू बसला होता. त्यामुळे उजव्या हाताचं बोट मोडलं होतं. पुढे पर्थ कसोटीत तो खेळू शकला नाही. तर आता शनिवारी कॅनबेरात होणाऱ्या सराव सामन्यालाही तो मुकणार आहे. ॲडलेड कसोटी ४ डिसेंबरला सुरू होणार आहे. तोपर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी शक्यताही कमीच दिसत असल्याचं समजतंय.  (Border – Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नाही; राहुल गांधींशी वाद घालायचा नाही; निवृत्त सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांची स्पष्टोक्ती)

‘सुरुवातीला शुभमनला १०-१४ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. आता सराव सामना तो नक्कीच खेळणार नाहीए. शिवाय बोट बरं झाल्यानंतरही त्याला चांगला सराव लागेल, तरंच तो खेळू शकणार आहे,’ असं बीसीसीआयच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे. अलीकडेच मुंबई आणि भारताचाही माजी निवड समिती सदस्य जतीन परांजपेने गिल १-२ कसोटींना मुकू शकतो अशीच शक्यता व्यक्त केली होती.  (Border – Gavaskar Trophy 2024)

‘बोटाला झालेल्या दुखापती किती नाजूक असतात. त्यातून सावरण्यासाठी कसा वेळ लागतो हे मला ठाऊक आहे. गिल २ ते ३ कसोटींना मुकू शकतो, असं मला अनुभवावरून मी सांगू शकतो,’ असं जतीन एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता. गिल खेळणार नसेल तर देवदत्त पड्डिकलला आणखी एक संधी मिळू शकते.  (Border – Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Earthquake: गुजरात, भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के!)

दरम्यान, मोहम्मद शमीलाही इतक्यात ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची घाई बीसीसीआय करणार नसल्याचं समजतंय. शमी घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर एका वर्षाने मैदानावर परतला आहे. एका रणजी सामन्यानंतर बंगालकडून सय्यद अली टी-२० स्पर्धेत सध्या तो खेळतोय. तो आता तंदुरुस्त असला तरी मोठ्या दौऱ्यावर त्याला लगेचच पाठवण्याचा बीसीसीआयचा विचार नसल्याचं समजतंय. शमीच्या अनुपस्थितीत भारताने पहिल्या कसोटीत हर्षित राणा आणि नितिश रेड्डी यांना संधी दिली. आणि दोघांनीही चांगली कामगिरी करून दाखवली आहे.   (Border – Gavaskar Trophy 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.