Cyber Crime : सेवानिवृत्त जहाज कप्तानची ११ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक

157
Cyber Crime : सेवानिवृत्त जहाज कप्तानची ११ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक
Cyber Crime : सेवानिवृत्त जहाज कप्तानची ११ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक
मुंबईतील या वर्षातील दुसरा  सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ७५ वर्षीय कुलाबा येथील सेवानिवृत्त जहाज कप्तानची शेअर ट्रेडिंग घोटाळ्याद्वारे सायबर माफियांनी ११ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. (Cyber Crime)
१९ ऑगस्ट २०२४  रोजी, तक्रारदाराचा मोबाईल नंबर एका प्रमुख वित्तीय सेवा कंपनीचे नाव असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडला गेला होता. अन्या स्मिथ नावाच्या एका महिलेने ग्रुपवर माहिती अपलोड केली आणि सहकारी सदस्यांना विचारले की ते  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत का, व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजल दुजोरा देत तक्रारदार यांनी  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास संमती दर्शवली. यानंतर स्मिथ नावाच्या महिलेने  तक्रारदार कप्तान यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये जोडले आणि एक लिंकही शेअर केली. तक्रारदाराने लिंकवर क्लिक करून ट्रेडिंगसाठी कंपनीचे ॲप डाउनलोड केले. यानंतर, त्याला स्मिथ आणि तिच्या सहकाऱ्यांकडून संस्थात्मक खाते ट्रेडिंग, ओटीसी ट्रेडिंग, आयपीओ इत्यादींबाबत संदेश मिळू लागले, असे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Cyber Crime)
स्मिथ आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिफारस केलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवायला लावले. वेगवेगळ्या  बँक खात्यांवर संशय निर्माण करून तक्रारदार यांनी तिला याबाबत विचारले असता, तिने कर वाचवण्यासाठी असे केले जात असल्याचे सांगितले. ५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान, तक्रारदाराने आरोपींच्या निर्देशानुसार २२ व्यवहारांमध्ये ११.१६ कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये पाठवले, असे तक्रारीत म्हटले आहे.हे व्यवहार करताना, तक्रारदाराने फारसा संशय घेतला नाही, कारण तो कंपनीच्या ॲपवर  खात्यात जमा होत असलेली रक्कम बघू शकत होता. ट्रेडिंग कंपनीच्या ॲपमध्ये त्यांच्या खात्यात मोठा नफा झाल्याचे पाहून तक्रारदाराला खूप खुश झाला होता मात्र, जेव्हा त्याने नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची विनंती नाकारण्यात आली. त्यानंतर त्याने स्मिथ या महिलेशी  संपर्क साधून त्याचा नफा काढण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर स्मिथने त्याला सांगितले की संपूर्ण रकमेवर २० टक्के सेवा कर भरावा लागेल. तक्रारदाराने हा “सेवा कर” भरला असूनही, त्याला पैसे काढण्यासाठी इतर शुल्कापोटी अधिक पैसे देण्यास सांगण्यात आले. (Cyber Crime)
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या शंका दूर करण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी  तक्रारदार मुंबईतील लोअर परळ येथे असलेल्या संबंधित वित्तीय सेवा कंपनीच्या मुख्य कार्यालयात गेले. त्याने गुंतवणूक केलेली रक्कम एका बोगस कंपनीत गुंतवल्याचे कळताच तक्रारदार यांना धक्काच बसला. या प्रकरणी त्याने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी दोन अज्ञात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Cyber Crime)
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, तक्रारदाराला गुंतवणुकीच्या उद्देशाने ज्या कंपनीच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले होते, ती युको बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅथलिकमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींकडे असल्याचे उघड झाले. भोपाळ , वांद्रे (मुंबई), नागपूर, सुरत , हैदराबाद, गाझीपूर, लखनौ , बनासकांठा, हावरा, येथे सीरियन बँकेच्या शाखा आहेत . पोलिसांनी भरुच, भिलाई आणि जयपूर येथील बँकांकडे पत्रव्यवहार करून खातेदारांची माहिती मागवली आहे. या वर्षातील मुंबईत दाखल झालेली सायबर फसवणुकीतील ही सर्वात मोठा दुसरा गुन्हा आहे, शहराच्या पश्चिम उपनगरातील एका ज्येष्ठ नागरिकाची डिजिटल अटक सायबर फसवणूक पद्धतीने सुमारे २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मुंबईतील या वर्षातील ही सर्वात मोठी सायबर फसवणूक प्रकरण आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांनी वृद्ध महिलेला घाबरवले होते. त्यांनी सांगितले की तिचे नाव मनी लाँडरिंग प्रकरणात आले आणि नंतर त्यांनी तिला फसवले आणि परत करण्यायोग्य पडताळणी प्रक्रियेच्या नावाखाली तिची जीवन बचत बँक खात्यांमध्ये जमा केली आणि तिची फसवणूक केली.  (Cyber Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.