अंधेरीतील (Andheri) एका रहिवाशी इमारतीला भीषण आग (Fire) लागली आहे. अंधेरी पश्चिममधील वीरा देसाई मार्गावरील शिंचन नावाच्या इमारतीत ही आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Fire)
(हेही वाचा-Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू; सुरक्षेसाठी CAPF च्या 288 कंपन्या तैनात)
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील लोकांना बाहेर काढले असून सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. वीरा देसाई मार्गावरील शिंचन इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. आज (२७ नोव्हें.) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. (Fire)
(हेही वाचा-PAN 2.0 Project : पॅन 2.0 मध्ये नेमकं आहे तरी काय? वाचा सविस्तर…)
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही, मात्र फ्लॅट जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Fire)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community