-
ऋजुता लुकतुके
नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात सर्वाधिक बोलीचा विक्रम रिषभ पंतने केला. पण, त्याच्या इतकाच लक्षात राहिला तो १३ वर्षं ८ महिने वयाचा वैभव सूर्यवंशी. ८ वीत शिकणारा बिहारच्या समस्तीपूरचा वैभव इतक्या लहान वयात कोट्याधीश झाला आहे. कारण, राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीने ३० लाखावरून बोली वाढवत थेट १.१ कोटी रुपयांत त्याला विकत घेतलं आहे. लहानग्या वैभववर इतके पैसे का लावले याचं थेट उत्तर आता फ्रंचाईजीचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिलं आहे. (IPL Mega Auction)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy 2024 : ॲडलेड कसोटीत यशस्वी जयसवालसह सलामीला कोण येणार? रोहित की राहुल?)
‘वैभवला क्रिकेटसाठी पोषक वातावरण आम्ही देऊ शकू. त्यामध्ये त्याची वाढही चांगली होईल. तो निवड चाचणीला आला होता, तेव्हाच आम्हाला आवडला. त्याच्या कौशल्याला पैलू पाडायचे असतील तर त्याला व्यावसायिक प्रशिक्षण हवं,’ असं राहुलने बोलून दाखवलं. (IPL Mega Auction)
आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओतच राहुलने हे सांगितलं.
“Rajasthan Royals will be a good environment for Vaibhav Suryavanshi” 🩷
Head Coach Rahul Dravid speaks about the youngest Royal and the look of the #RR squad post the #TATAIPLAuction 👌👌#TATAIPL | @rajasthanroyals pic.twitter.com/GuCNpWvgsD
— IndianPremierLeague (@IPL) November 26, 2024
वैभव सूर्यवंशी सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघात खेळतोय. अलीकडेच चेन्नईत ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाबरोबर झालेल्या कसोटींत वैभवने शतक झळकावलं. ६२ चेंडूंत १०४ धावा करताना सगळ्यात लहान वयात आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. इतकंच नाही तर बिहार कडून सध्या तो सय्यद अली टी-२० स्पर्धेतही खेळत आहे. त्याने एका सामन्यात ६ चेंडूंत १३ धावा केल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तो ५ सामने खेळला आहे. पण, इथं त्याची सरासरी अवघी १० धावांची आहे. (IPL Mega Auction)
(हेही वाचा- Fire : अंधेरीत रहिवासी इमारतीला भीषण आग; जीवितहानी नाही)
रणजीच्या गेल्या हंगामात १२ वर्षांचा असताना बिहारकडून त्याने पदार्पण केलं आहे. तो बिहारच्या एका छोट्या खेड्यातून येतो. आतापर्यंत त्याने आपल्या फलंदाजीने जाणकार लोकांवर छाप पाडली आहे. आता चांगली संधी मिळाली तर तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल अशी आशा आहे. (IPL Mega Auction)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community