केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आणि देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांविषयी ‘X’ वर एक पोस्ट केली आहे.या पोस्ट मध्ये त्यांनी सर्वच मतदारांचे भाजपाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. (Amit Shah)
महाराष्ट्रात महायुतीचा विजय हा प्रत्येक महाराष्ट्रवासीयाचा विजय असल्याचे शहा यांनी म्हटलं आहे. तसेच संविधानाचे खोटे समर्थक असलेल्यांच्या दुकानांना महाराष्ट्रातील जनतेने टाळे ठोकले असल्याचा टोमणाही त्यांनी विरोधकांना मारला आहे. महायुतीचा हा विजय मोदीजींच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारच्या ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’चा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेने तुष्टीकरणाचे राजकारण नाकारून महायुतीचा वारसा, विकास आणि गरिबांचे कल्याण यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. (Amit Shah)
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्राने, विकासाबरोबरच संस्कृती आणि राष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या महायुतीला एवढे प्रचंड बहुमत देऊन, संभ्रम आणि खोटेपणाच्या आधारे संविधानाचे नकली हितचिंतक बनणाऱ्यांच्या दुकानाला टाळे ठोकण्याचे काम केले आहे. हा विजय प्रत्येक महाराष्ट्रवासियाचा विजय आहे. (Amit Shah)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy 2024 : ॲडलेड कसोटीत यशस्वी जयसवालसह सलामीला कोण येणार? रोहित की राहुल?)
पुढे ते म्हणाले की, ‘महायुतीचा हा विजय पंतप्रधान महाराष्ट्रातील जनतेने लांगुलचालनाचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून महायुतीची परंपरा, विकास आणि गरीब कल्याणावर पुन्हा आपला विश्वास व्यक्त केला आहे. या भव्य विजयासाठी भाजपा महाराष्ट्राचे सर्व कार्यकर्ते, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना हार्दिक शुभेच्छा देखील शहा यांनी दिल्या आहेत. गृहमंत्री शाह यांनी झारखंडमधील भाजपच्या कामगिरी विषयी ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, झारखंडमध्ये भाजपला सर्वाधिक मतांच्या टक्केवारीचा आशीर्वाद दिल्याबद्दल मी राज्यातील तमाम जनतेचे आभार व्यक्त करतो, तसेच, मी झारखंड भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या अथक परिश्रमासाठी शुभेच्छा देतो. आदिवासी समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांची अस्मिता जपणे ही भाजपची सर्वोच्च प्राथमिकता आहे. NDA चे केंद्रातील सरकार झारखंडच्या जनतेचा विकास, प्रगती आणि आदिवासी वारशाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही या दिशेने काम करत राहू. झारखंडमध्ये भाजप सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. (Amit Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community