आरटीओने रद्द केले ३९ हजारांपेक्षा जास्त Driving license; हे आहे कारण…

92
वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. कोणताही नियम मोडल्यास चालान किंवा काही महिन्यांसाठी तुरुंगवासही होऊ शकतो. मुंबई महानगर प्रदेशातील (RTO) मुंबई सेंट्रल, बोरिवली, वडाळा, पनवेल, वाशी, कल्याण, ठाणे आणि अंधेरी या उपप्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात ३९ हजार ६२७ वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती (Driving license revoked) विविध कारणांसाठी रद्द केले आहेत. (Driving license)
दरम्यान, वाहतूक नियमनासाठी आरटीओकडून शहरांमध्ये आणि टोलनाक्यांवर तसेच हायवेवर वाहनांची तपासणी सुरू असते. तपासणीदरम्यान वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. काहीवेळा गंभीर स्वरूपाच्या घटनांमध्ये किंवा वारंवार एकाच प्रकारच्या नियमाचे उल्लंघन केल्यास आरटीओकडून त्यांचे परवाने रद्द करण्यात येत असतात. तसेच सर्वाधिक कारवाई ही नवी मुंबईतील वाशी येथे करण्यात आली. या कारवाईत १४०२९ इतकी रद्द करण्यात आलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची संख्या आहे. तर त्या पाठोपाठ पनवेल आणि ठाण्यामध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आल्याचे आरटीओने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तसेच अंधेरी आरटीओमध्ये (Andheri RTO) एकही लायसन्स रद्द करण्यात आलेले नाही.

(हेही वाचा –Assembly election results: महाराष्ट्रात २८८ पैकी १८७ नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे; एडीआरचा धक्कादायक अहवाल )

ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यामगाची ही आहेत कारणे 

यामध्ये ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive), सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापराने, मालवाहू गाड्यांमध्ये जास्त सामान भरणे, अधिकची प्रवासी वाहतूक, मालवाहतूक गाडीमधून प्रवासी वाहतूक करणे, ओव्हर स्पीडिंग, सिग्नल जंपिंग, वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे, अशा विविध कारणांसाठी लायसन्स रद्द करण्यात आले असल्याची माहिती आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
(हेही वाचा – Bajrang Punia : बजरंग पुनियावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी)
आरटीओ कार्यालय    रद्द लायसन्स  (एप्रिल ते ऑक्टोबर – २०२४)   
ताडदेव                          ३४१३ 
वडाळा                           ९५६ 
ठाणे                              ८६७० 
वाशी                             १४०२९ 
कल्याण                          ८६७ 
पनवेल                           ९४८१ 
बोरिवली                          ४४

 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.