MVA च्या केवळ एका महिलेला जनतेने स्वीकारले; २७ महिलांना नाकारले!

72
MVA च्या केवळ एका महिलेला जनतेने स्वीकारले; २७ महिलांना नाकारले!
  • खास प्रतिनिधी 

राज्यात लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीला स्पष्टपणे नाकारले, त्याचा फटका महिला उमेदवारांनाही बसला. महाविकास आघाडीच्या २८ महिला उमेदवारांपैकी एकमेव महिला विधानसभेत पोहोचू शकली तर महायुतीच्या २० महिला आमदार झाल्या. (MVA)

महायुतीच्या २० महिला विधानसभेत

महायुतीतील भाजपाने १४८ उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरवले होते त्यात १७ महिला होत्या. या १७ पैकी १४ महिलांना मतदारांनी विधानसभेत धाडले. शिवसेनेने ८५ उमेदवारांमध्ये ७ महिला उभ्या केल्या होत्या त्यातील २ महिलांना विधानसभेत जाण्याची संधी मतदारांनी दिली तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाने ५५ पैकी पाच महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले होते त्यातील चार महिला निवडून आल्या. महाविकास आघाडीने २९ महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले त्यातील २० महिला निवडून आल्या. (MVA)

(हेही वाचा – Assembly election results: महाराष्ट्रात २८८ पैकी १८७ नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे; एडीआरचा धक्कादायक अहवाल)

‘मविआ’च्या २७ महिलांना घरी बसवले

महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेसने १०२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले त्यात केवळ ७ महिलांना संधी दिली होती. मात्र, जनतेने त्यातील केवळ धारावीतील उमेदवार ज्योती गायकवाड या एकमेव महिलेला विधानसभेत पाठवले. ज्योती या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांही बहीण आहे. शिवसेना उबाठाने ९५ जागा लढवल्या त्यात केवळ १० महिलांना उमेदवारी दिली मात्र त्यांच्या दुर्दैवाने एकाही महिलेला मतदारांनी स्वीकारले नाही. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ८६ पैकी ११ महिलांना मैदानात उतरवले पण मतदारांनी सगळ्याच महिला उमेदवारांना नाकारले. (MVA)

माजी आमदार पराभूत

काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री तिवसा विधानसभा मतदारसंघातील यशोमती ठाकूर, मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, भायखळा मतदारसंघातील शिवसेनेच्या यामिनी जाधव, अंधेरी पूर्वच्या शिवसेना उबाठाच्या ऋतुजा लटके अशा अनेक महिलांना लाडक्या बहिणींनी नाकारले. (MVA)

(हेही वाचा – Agra-Lucknow Expressway वर भीषण अपघात, लग्नावरून परतणाऱ्या 5 डॉक्टरांचा मृत्यू)

मागील विधानसभेत २४ महिला आमदार

विधानसभा निवडणुकीत एकूण ३६३ महिला आपले नशीब आजमावत होत्या मात्र २१ महिलांना नशिबाने साथ दिली आणि आमदार म्हणून विधानसभेत पाठवले. गेल्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २३५ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या त्यातील २४ महिला आमदार झाल्या. (MVA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.