महाराष्ट्रातील आठ आमदारांनी विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा पराभव करत विधानसभा निवडणुक सलग आणखी एक विजय मिळवला आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील(Jayant Patil ), दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांना आठव्यांदा विजय मिळवला. तर भाजपाचे गिरीश महाजन, विजयकुमार गावित, राधाकृष्ण विखे पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांनी सातव्यांदा आमदारकी मिळवली आहे. त्याशिवाय कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विजयी झाले. (Assembly Election)
( हेही वाचा : Assembly election results: महाराष्ट्रात २८८ पैकी १८७ नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे; एडीआरचा धक्कादायक अहवाल)
महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकरी कामगार पक्षाचे गणपत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून ११ वेळा आमदार होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तर बाळासाहेब थोरात हे सलग आठ वेळा विजयांसह विधानसभेत सर्वाधिक काळ आमदार राहिलेले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमधून भाजपाच्या अमोल खताळ यांनी थोरातांचा १० हजार ५६० मतांनी पराभव केला. १९६२ नंतर पहिल्यांदाच भाजपाला या जागेवर विजय मिळवता आला. (Assembly Election)
दरम्यान जयंत पाटील, अजित पवार(Ajit Pawar), दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) , हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला असला तरी त्याच्या विजयाच्या मताधिक्यात तुलनेत लक्षणीय घट झालेली आहे. २०१९ च्या तुलनेत दिलीप वळसे पाटील यांच्या मताधिक्यात १, ५२३ मतांमध्ये घट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाच्या विरोधात भाजपाच्या चार आमदारांनी सातव्यांदा विजय मिळवला आहे. तसेच त्यांच्या मताधिक्यात ही वाढ झालेली आहे. (Assembly Election)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community