राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र या निवडणुकीत प्रचारसभांसाठी वापारण्यात आलेल्या आलेल्या वाहनांमधून (Election Vehicle) उमेदवार आपली ओळख, आपला अजेंडा अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने वाहनावर वेगवेगळ्या प्रचाररथ तयार करत असतात. तसेच गावागावांत प्रचारासाठी विविध वाहने फिरत असतात. परंतु प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत असणे अपेक्षित असते. अशाच वाहनांना राज्य परिवहन विभाग (State Transport Department) म्हणजेच आरटीओने अटी-शर्तीसह सशुल्क परवानगी दिली होती. या वाहनांच्या शुल्कातून आरटीओला साडेआठ लाखांचा महसूल मिळाला. (RTO)
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) मुंबईच्या चार आरटीओ कार्यालयांच्या माध्यमातून ५६८ रिक्षा आणि टॅक्सींना परवानगी देण्यात आली होती. ताडदेव, अंधेरी, बोरिवली, वडाळा या उपप्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून उमेदवारांच्या प्रचारात रिक्षा-टॅक्सी आणि इतर चारचाकी वाहनांच्या वापरासाठी अटी-शर्तीसह सशुल्क परवानगी दिली होती. या वाहनांच्या शुल्कातून आरटीओला साडेआठ लाखांचा महसूल मिळाला. प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचा वापर प्रचारासाठी करायचा असल्यास त्याची परवानगी आरटीओकडून घ्यावी लागते. त्यासाठी ठरावीक शुल्क आकारण्यात येते. या शुल्काच्या माध्यमातून आरटीओला ८ लाख ७८ हजारांचा महसूल मिळाला आहे.
(हेही वाचा – BJP ला सरकार स्थापन करण्यास Shiv Sena, NCP चा पाठिंबा; फडणविसांचा मार्ग मोकळा!)
असा मिळाला महसूल
ताडदेव आरटीओ (Taddev RTO) मध्ये १६७ टॅक्सींना परवानगी दिली होती. त्याच्या माध्यमातून ३ लाख ३४ हजारांचा महसूल प्राप्त झाला. तर अंधेरी आरटीओने ७८ रिक्षा- टॅक्सीच्या माध्यमातून १ लाख ९,५०० रुपयांचा, वडाळा आरटीओने २४८ वाहनांच्या माध्यमातून ३ लाख ५,५०० रुपयांचा महसूल मिळाला. तसेच बोरिवलीमध्ये ७५ वाहनांना परवानगी दिली होती. तिच्या माध्यमातून १ लाख २९ हजार रुपये आरटीओला मिळाले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community