मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे नाराज नसल्याच्या वावड्या उठवल्या, परंतु एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वत: पुढे येऊन आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे महायुतीला पुढे घेऊन जाण्याचा शिंदेंचा निर्णय महत्त्वाचा आहे, असे विधान बावनकुळे यांनी केले.
( हेही वाचा : BJP ला सरकार स्थापन करण्यास Shiv Sena, NCP चा पाठिंबा; फडणविसांचा मार्ग मोकळा!)
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंवर मविआने प्रश्न उपस्थित केले. मात्र एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भूमिका स्पष्ट करत. आता भाजपाला (BJP) समर्थन जाहिर केले आहे. त्यामुळे मविआच्या तोंडाच्या वाफा या वाफाच राहिल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपाला केलेल्या गद्दारीनंतर एकनाथ शिंदे हिंदूत्वासाठी महायुतीत सामील झाले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी खूपच चांगले काम केले, असे ही बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community