मुंबईत लोकल रेल्वेच्या (Mumbai Local Railway) प्रवाशांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तसेच मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वेला जोडणारा दादर स्थानक (Dadar Railway) वर्दळीचे स्थानक म्हणून ही ओळखला जातो. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. (Dadar Railway)
(हेही वाचा –
MVA च्या केवळ एका महिलेला जनतेने स्वीकारले; २७ महिलांना नाकारले!)
मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे या दोन विभागांना दादर स्थानक जोडले गेले आहे. दररोज या स्थानकातून सुमारे ५ लाख नागरिक प्रवास करत असतात. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी हे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज ८०० लोकल आणि मेल-एक्स्प्रेस धावतात. मात्र मात्र दादर स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ कमी करण्याच्या उद्देशाने बुधवार, २७ नोव्हेंबरपासून फलाट क्रमांक १० ऐवजी फलाट क्रमांक ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ ऐवजी फलाट क्रमांक १० म्हणून ओळखला जाईल. तसेच प्रवाशांना गैरसोयीतून मार्ग काढण्यासाठी फलाटांचे क्रमांक (Dadar platform number) बदलण्यात आले होते.
(हेही वाचा – Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत १४ डिसेंबरपर्यंत वाढवली)
याआधीही डिसेंबर २०२३ मध्ये पश्चिम रेल्वेच्या फलाटांचे क्रमांक न बदलता, मध्य रेल्वेवरील १ ते ८ फलाटांचे क्रमांक अनुक्रमे ८ ते १४ असे करण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांकावरून दररोज शेकडो प्रवाशांचा गोंधळ उडत होता. लोकलसह लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे फलाट शोधून त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वेळ वाया जात होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community