- खास प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मतदारांनी नाकारल्यानंतर काही निवडक प्रसार माध्यमांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे फुकटचे सल्ले देत त्यांची तळी उचलून धरली. मात्र, राज आणि उद्धव यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता माध्यमांच्या चर्चेकडे साफ दुर्लक्ष केले. (Raj-Uddhav)
(हेही वाचा – RTO मालामाल! प्रचारातील वाहनांतून लाखोंचा महसूल)
आदित्यचे मताधिक्य ७०,००० वरून ८,०००
राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या वळणावर जाईल, राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, वगैरे आडाखे बांधत दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, असे आवाहन माध्यमातील काहींनी केले. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठाने ९५ जागा लढवल्या पण त्यापैकी केवळ २० जागा निवडून आल्या. त्यात उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे २०१९ च्या ७०,००० मताधिक्याच्या तुलनेत २०२४ मध्ये ८,००० मताधिक्यापर्यंत खाली आले, पण निवडून आले. (Raj-Uddhav)
(हेही वाचा – Assembly Election मध्ये ३ आमदार आठव्यांदा तर ५ आमदार सातव्यांदा विजयी; थोरातांच्या नऊ वेळा आमदार होण्याच्या रेकॉर्डला ब्रेक)
माध्यम समर्थकांनाच अधिक दुःख
तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साधारण १३५ पर्यंत उमेदवार उभे केले मात्र एकही निवडून येऊ शकला नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये एक-एक आमदार तरी पक्षाचा निवडून येत होता. २०२४ च्या विधानसभेत एकही मनसेचा आमदार विधानसभेत नसेल. याचे दुःख माध्यमातील त्यांच्या समर्थकांनाच अधिक झाले आणि त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे आणि राजकारण करावे, असे मत व्यक्त दिले. (Raj-Uddhav)
एकत्र येण्याची शक्यता नसल्यासारखीच
या विषयावर शिवसेना उबाठा आणि मनसे या दोनही पक्षात उघडपणे होताना दिसत नाही पण अंतर्गत कुजबूज मात्र सुरू झाली. शिवसेना उबाठामधील कार्यकर्त्यांच्या मते, राज आणि उद्धव यांचा स्वभाव अजिबात जुळवून घेणाचा नाही, कमीपणा घेण्याचा दोघांचा स्वभाव नसल्याने नेतृत्व कोणी कोणाचे करायचे, यावरूनच त्यांचे एकत्र येण्याआधी खटके उडायला सुरुवात होईल. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता नसल्यासारखीच आहे, असे काही शिवसैनिकांनी सांगितले. (Raj-Uddhav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community