- विशेष प्रतिनिधी, मुंबई
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाला भाजपा लागली असून गरीब व गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना स्वयंरोजगाराकरता यंत्र सामग्री देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. केंद्राचा निधीचा वापर आता मुंबईत केला जात असून यासाठीचा पाच कोटींचा निधी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी मिळवला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून शीव कोळीवाडा, प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल, शीव आदी भागातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. (BMC Election)
(हेही वाचा – Accident : कुर्ला पूर्व येथे धावत्या डंपरच्या चाकाखाली येऊन आई आणि मुलाचा मृत्यू)
महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील गरजू महिलांचे सक्षमीकरण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने घरघंटी, शिवणयंत्र थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी धोरणानुसार महापालिकेच्या नियोजन विभागाच्या स्वयंरोजगाराकरता यंत्रसामुग्री या योजनेच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या पत्रानुसार राबवण्याचे ठरवले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत महिलांच्या स्वयंरोजगारासाठी घरघंटी, शिवणयंत्र आदी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून एकूण पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान व मुंबई उपनगर अंतर्गत शासनाच्या विशेष निधीतून गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदीकरता शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण धोरणान्वये अनुदान देण्यात येणर आहे. त्यानुसार एफ उत्तर विभागातील गरीब व गरजू महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. (BMC Election)
(हेही वाचा – अंधेरीतील Gokhale-Barfiwala Bridge च्या ‘त्या’ जोडणीचा अतिरिक्त भार; पावणेचार कोटींचा वाढला खर्च)
महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील प्राप्त झालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीपैंकी शिवण यंत्रासाठी अडीच कोटी आणि घरघंटी करता अडीच कोटी अशाप्रकारे विभाजित करून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येईल. शिवणयंत्राकरता २४२० व घरघंटी १२३५ एवढ्या महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी १० हजार १४३ रुपयांचे शिवणयंत्र आणि २० हजार ०६१ रुपयांची घरघंटी विभागातील जनतेला दिली जाणार आहे. शासनाच्या आणि महापालिकेचय योजनेतून यंत्रसामुग्री योजनेचा लाभ यापूर्वी न घेतलेल्या महिलेलाच याचा लाभ घेता येणार आहे. (BMC Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community