World Chess Championship : तिसऱ्या लढतीत लिरेनला हरवून गुकेश बरोबरीत

100
  • ऋजुता लुकतुके
बुधवारी भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने (D Gukesh) बुद्धिबळ (Chess game) जगज्जेतेपदाच्या लढतीत डिंग लिरेनचा (Ding Liren) पराभव केला. आणि अंतिम लढतीत १.५ विरुद्ध १.५ गुण अशी बरोबरी साधली. पहिल्या डावात काळे मोहरे घेऊन खेळताना केलेल्या चुका गुकेशने कटाक्षाने टाळल्या. आणि आक्रमक सुरुवात करूनही डावावर पूर्ण वर्चस्व मिळवलं. वेळेच्या बाबतीतही गुकेश अगदी काटेकोर होता. शिवाय विशेष म्हणजे हीच ओपनिंग पहिल्या डावात गुकेशने केली होती. पण, डावाच्या मध्यावर त्याचा प्रयत्न फसला होता. त्या सगळ्या चुका बुधवारी गुकेशने टाळल्या. उलट डावावर सुरुवातीपासून वर्चस्व राखत सामना जिंकला. आणि महत्त्वाचं म्हणजे लढतीत बरोबरी साधली. (World Chess Championship)
उलट या डावात डिंग लिरेनसाठी वेळेचं गणित बिघडत गेलं. अंतिम लढतीत वेळेचं महत्त्व मोठं आहे. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या पहिल्या ४० चाली १२० मिनिटांत पूर्ण करणं बंधनकारक आहे. आणि या लढतीत गुकेशने ४ मिनिटांतच १६ चाली रचल्या. तर तितक्याच चाली रचण्यासाठी लिरेनने १ तास आणि ६ मिनिटं घेतली. त्याचं दडपण अखेर लिरेनवर आलं. आणि तेराव्या चालीपर्यंत गुकेशने पटावर वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं.
डावाचा मध्यावर सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं होतं. ‘आज खूप छान वाटतंय. गेले दोन दिवस माझा खेळ चांगलाच होतोय. त्यातही आज विजय मिळाल्यामुळे समाधान आहे. मी प्रतिस्पर्ध्याला मात देऊ शकलो. या लढतीत काळे मोहरे घेऊन खेळताना दोन विजय मिळवले गेले आहेत, हे विशेष आहे,’ असं गुकेश सामन्यानंतर म्हणाला.

(हेही वाचा – मुख्यमंत्रि‍पदाबाबत Devendra Fadnavis यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, महायुती…)

या सामन्यात गुकेशने क्वीन गँबिटची (Queen Gambit) फारशी प्रचलित नसलेली रणनीती वापरली. अलीकडे व्लादिमीर क्रामनिकने अर्जुन एरिगसीविरुद्ध ही रणनीती शेवटची वापरली होती. ही आक्रमक आणि प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकणारी रणनीती आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.