Andheri Pilot suicide case : एअरइंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या, मित्राला अटक

92
Andheri Pilot suicide case : एअरइंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या, मित्राला अटक
Andheri Pilot suicide case : एअरइंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या, मित्राला अटक
मित्राच्या मानसिक त्रासाला कंटाळून २५ वर्षीय महिला वैमानिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवई येथे उघडकीस आली आहे.पवई पोलिसांनी तिच्या मित्रा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे. (Andheri Pilot suicide case)
सृष्टी तुली असे आत्महत्या केलेल्या महिला वैमानिकाचे नाव आहे, सृष्टी ही एअर इंडिया कंपनीत वैमानिक होती. मूळची गोरखपूर जिल्ह्यात  राहणारी  सृष्टी तुली (२५) ही सन २०१९ पासुन दिल्ली येथील व्दारका येथे रहावयास होती. या ठिकाणी पायलटचे प्रशिक्षण चालु होते, प्रशिक्षण पूर्ण केलेनंतर ती एअर इंडीया कंपनीत पायलट म्हणुन नोकरी लागली. सृष्टी ही जुन २०२३ पासुन मुंबइतील अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलिस कॅम्पच्या मागे असलेल्या एका खाजगी सोसायटीत राहण्यास होती.सृष्टी तुली रविवारी काम आटोपून घरी परतली असता, पंडित याच्याशी उशिरा येण्या-जाण्यावरून तिचा वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Andheri Pilot suicide case)
पहाटे एकच्या सुमारास पंडित दिल्लीला रवाना झाले. तुलीने त्याला फोनवर कॉल केला आणि ती टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा कथित खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नंतर तिच्या जागी परतला पण दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने एका चावी बनविणाऱ्याला  कॉल केला, खोली उघडली आणि  मृत अवस्थेत आढळून आली, मित्र पंडित यांने तिला तातडीने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले, तेथे तुलीला मृत घोषित करण्यात आले. तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. (Andheri Pilot suicide case)
पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, तुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्यांनी पंडितला भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे निरीक्षकाने सांगितले. (Andheri Pilot suicide case)
“पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही लॉक केलेला महिलेचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये आरोपींसोबत झालेल्या संभाषणांचे विश्लेषण करण्यासाठी पाठवला आहे. आम्ही लवकरच तिच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र, सहकारी आणि रूममेट यांचे जबाब नोंदवू,” सोनवणे पुढे म्हणाले. (Andheri Pilot suicide case)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.