महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. तर, मविआचा सुफडा साफ झाला. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जात होती. तर, भाजपच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जातेय. याच मुद्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, “सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत. आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका. जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा. जनतेने तुम्हाला का नाकारले आहे, यावर चिंतन करा. कारण सध्या तुमच अस झालय, सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही.” अशा शब्दात चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्ट सुप्रिया सुळे…
आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका..जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा..जनतेने तुम्हाला का नाकारले आहे यावर चिंतन करा.
कारण सध्या तुमच अस झालय “सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही.”@mahancpspeaks |…— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 27, 2024
दरम्यान, आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदावरीला दावा सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community