चोरीच्या गुन्ह्याचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या एका मोलकरणीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. वनिता उर्फ आशा शैलेंद्र गायकवाड असे या मोलकरीणचे नाव आहे. वनिता ही श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करता करता एका आठवड्यात घरातील मौल्यवान वस्तू,रोकड चोरी करून पसार होते. वनिता हिच्यावर मुंबई, ठाणे, नवीमुंबई ५० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. वनिताने चोरीच्या गुन्ह्यातून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली असून ती एकाच ठिकाणी न राहता प्रत्येक वेळी राहण्याचे ठिकाण बदलत असते अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Mumbai Crime)
वनिता हिने नुकतीच नवीमुंबईतील वाशी सेक्टर ९ मध्ये राहणारे ५९ वर्षीय झाकीर अहमदबाबा म्हाते यांच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला गेली आणि चार दिवसातच म्हाते यांचे घर साफ करून पसार झाली होती. वनिता हिने म्हाते यांच्या घरातून दागदागिने रोख रक्कम असा एकूण साडे तीन लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला होता.याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. (Mumbai Crime)
दरम्यान वाशी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील महिला ही चेंबूर येथील आरसीएफ, माहुल गाव म्हाडा कॉलनी येथे असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ चे पोलीस हवालदार अजय बल्लाळ यांना मिळाली. कक्ष ७ चे प्रभारी आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोळी उपनिरीक्षक काळे, परबळकर, पो. हवा.अजय बल्लाळ, पवार, महिला पोलीस हवालदार तिरोडकर या पथकाने माहुल गाव, म्हाडा कॉलनी येथे सापळा रचून वनिता गायकवाडला ताब्यात घेऊन कक्ष कार्यालयात आणले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तीने वाशी येथे झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली. वनिता ही सराईत गुन्हेगार असून मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत तीच्यावर या प्रकारचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. (Mumbai Crime)
गुन्ह्याची पद्धत…..
वनिता गायकवाड ही वेगवेगळ्या नावाने मुंबई, ठाणे आणि नवीमुंबईतील उच्चभ्रू वस्तीत फिरून अतीउच्च सोसायटीतील वॉचमन सोबत ओळख वाढवून कुणाला मोलकरीणची गरज असल्यास मला कळवा असे सांगत असे, त्यानंतर तीला मोलकरीणचे काम मिळाल्यानंतर दोन दिवस ती प्रामाणिकपणे काम करून संपूर्ण घराची रेकी करते, त्यानंतर संधी मिळताच घरातील मौल्यवान वस्तू,रोख रक्कम घेऊन तेथून कायमची पसार होत असे, पोलीस तिच्यापर्यत पोहचू नये म्हणून ती प्रत्येक ठिकाणी आपले नाव बदलून सांगते, व पत्ता चुकीचा देत असल्यामुळे तिचा शोध घेणे पोलिसांना अवघड होते. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community