Central Railway च्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले; जाणुन घ्या …

78
Central Railway च्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले; जाणुन घ्या ...
Central Railway च्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले; जाणुन घ्या ...

उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाने दादर (Dadar) स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. बुधवार, २७ नोव्हेंबरपासून फलाट क्रमांक १० ऐवजी फलाट क्रमांक ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ ऐवजी फलाट क्रमांक १० म्हणून ओळखला जाईल.

(हेही वाचा-Rupali Chakankar: “सुंभ जळाला तरी…”, रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला)

मध्य आणि पश्चिम रेल्वे (Central Railway) या दोन विभागांना दादर स्थानक जोडले गेले आहे. दररोज या स्थानकातून सुमारे ५ लाख नागरिक प्रवास करत असतात. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी हे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज ८०० लोकल आणि मेल-एक्स्प्रेस धावतात. मात्र दादर स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ कमी करण्याच्या उद्देशाने फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले. (Central Railway)

(हेही वाचा-Andheri Pilot suicide case : एअरइंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या, मित्राला अटक)

याआधीही डिसेंबर २०२३ मध्ये पश्चिम रेल्वेच्या फलाटांचे क्रमांक न बदलता, मध्य रेल्वेवरील १ ते ८ फलाटांचे क्रमांक अनुक्रमे ८ ते १४ असे करण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) फलाट क्रमांकावरून दररोज शेकडो प्रवाशांचा गोंधळ उडत होता. त्यामुळे अनेकांना लोकलसह लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे फलाट शोधून त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वेळ वाया जात होता. त्यामुळे या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले होते. (Central Railway)

मुख्य बदल: (Central Railway)
१. प्लॅटफॉर्म क्रमांक १० (जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या दोन्ही थांबत होत्या) त्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ए असे बदल करण्यात आले आहे आणि ते फक्त उपनगरीय गाड्यांना सेवा देईल.

२. प्लॅटफॉर्म १० ए (जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या देखील थांबत होत्या) चे प्लॅटफॉर्म क्रमांक १० असे करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म आता फक्त मेल/एक्स्प्रेस गाड्यांना सेवा देऊन २२ डब्यांच्या गाड्यांसाठी पुरेशी जागा सुनिश्चित करेल.

पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक – नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक
०८ – ०८
०९ – ०९
१० – ९ ए
१० ए – १०
११ – ११
१२ – १२
१३ – १३
१४ – १४

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.