Jammu and Kashmir : दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी गृह मंत्रालयाने उचललं मोठ पाऊल; एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात राहणार

77
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी गृह मंत्रालयाने उचललं मोठ पाऊल; एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात राहणार
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी गृह मंत्रालयाने उचललं मोठ पाऊल; एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात राहणार

जम्मूमध्ये (Jammu and Kashmir) वाढत्या दहशतवाद्यांच्या कारवाया लक्षात घेता, गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) मोठा निर्णय घेतला आहे. एनएसजी (NSG) कमांडोचे टास्क फोर्स जम्मू शहरात कायमस्वरूपी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी ही टास्क फोर्स तत्काळ कारवाई करण्यास तयार असणार आहे. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा-Rupali Chakankar: “सुंभ जळाला तरी…”, रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनएसजीचे एक विशेष पथक आता जम्मू शहरात कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दहशतवाद्यांशी काही मिनिटांतच मुकाबला करण्यासाठी हे पथक सज्ज असेल. जम्मू भागात नुकतेच सुरक्षा दलांवर झालेले दहशतवादी हल्ले आणि शहराला संभाव्य धोका लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा-“माझे बाबा…”, Shrikant Shinde यांची वडील एकनाथ शिंदेंसाठी भावनिक पोस्ट)

सुरक्षेच्या कारणास्तव NSG कमांडोची संख्या उघड करण्यात आलेली नाही, परंतु अधिकाऱ्यांनी त्याचे वर्णन “पुरेसे” असे केले आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ले झाल्यास एनएसजी कमांडोंना नवी दिल्ली किंवा चंदीगड येथून बोलवावे लागत, ही प्रक्रिया वेळखाऊ होती. मात्र, आता एनएसजी कमांडोची स्थानिक उपस्थिती त्वरित कारवाई करेल. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा-Andheri Pilot suicide case : एअरइंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या, मित्राला अटक)

NSG कमांडोची तैनाती जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या (JKP) दहशतवादविरोधी योजनेचा एक भाग आहे. ही योजना प्रामुख्याने उंच इमारती, शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल आणि इतर संवेदनशील ठिकाणांना दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.