कॉल सेंटरमध्ये तरुणांकडून सायबर फसवणूक प्रकरणी NIA ची 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी

38
कॉल सेंटरमध्ये तरुणांकडून सायबर फसवणूक प्रकरणी NIA ची 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी
कॉल सेंटरमध्ये तरुणांकडून सायबर फसवणूक प्रकरणी NIA ची 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी (२८ नोव्हें.) मानवी तस्करीशी संबंधित एका प्रकरणात 6 राज्यांतील 22 ठिकाणी छापे टाकले. इंटेलिजन्स इनपुटच्या (Intelligence input) आधारे, मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळीला पकडण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठे नेटवर्क असण्याची शक्यता आहे. हे नेटवर्क तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करते. यानंतर त्यांना सायबर फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले जाते. (NIA)

तस्करी करून परदेशात पाठवल्याचा संशय
बिहारच्या गोपालगंजमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनआयएने हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. तस्करांचे जाळे देशातील महिला, पुरुष आणि लहान मुलांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तस्करी करतात. ही टोळी तस्करी करून काही लोकांना परदेशात पाठवते असा एनआयएला संशय आहे. परदेशी तस्करांच्या टोळीशीही त्यांचा संबंध असल्याचा संशय आहे. राज्य पोलिसांच्या मदतीने एनआयएची वेगवेगळी पथके सकाळपासून अनेक ठिकाणी तपास करत आहेत. (NIA)

हेही वाचा- PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून महिला ताब्यात

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील खलिस्तानी दहशतवादी अर्श डल्लाच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकले. तीन राज्यांतील 9 जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. अर्श डल्लाला कॅनडात अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एनआयएच्या पथकाने ज्या कुटुंबावर छापा टाकला त्या कुटुंबाचे 4 ते 5 मोबाईल फोनही जप्त केले आहेत. पाकिस्तानात (Pakistan) बसलेल्या व्यक्तीला कुटुंबातील सदस्याने मोबाईलवर कॉल केल्याची घटना समोर आली आहे. (NIA)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.