- ऋजुता लुकतुके
नुकत्याच सौदी अरेबियाच्या जेद्दाह इथं झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात दहाही संघ मालकांनी आपल्याकडचे ६३९.१५ कोटी रुपये १८४ खेळाडूंवर खर्च केले. २०२५ च्या हंगामासाठी त्यांची संघ बांधणी त्याबरोबर पूर्ण झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सनी २७ कोटी रुपये मोजत रिषभ पंतला विकत घेतलं. तर पंजाब किंग्जनी २६.७५ कोटी रुपयांची बोली श्रेयस अय्यरसाठी लावली. लिलाव आता संपलाय आणि खेळाडूंच्या खरेदीनंतरही आयपीएल फ्रँचाईजींकडे काही पैसे शिल्लक आहेत. बंगळुरू संघाकडे सर्वाधिक ७५ लाख रुपये बाकी आहेत. तर चेन्नई आणि कोलकाता संघाकडेही प्रत्येकी किमान ५ लाख रुपये शिल्लक आहेत. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – Cheetah Kuno: कुनो नॅशनल पार्कमधील ‘त्या’ चित्त्यांच्या दोन बछड्यांचा मृत्यू)
फ्रँचाईजींना लिलावात नेमकी किती रक्कम खर्च करता येईल यावर बीसीसीआयचं नियंत्रण होतं. संघांना आधीचे ६ खेळाडू कायम ठेवण्याची मुभा होती. लिलावाची सर्व प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी संघांकडे १२० कोटी रुपयांची पर्स देण्यात आली होती. त्यातून जे खेळाडू संघांना कायम राखायचे होते त्यांच्यावर पैसे खर्च करावे लागणार होते आणि त्यातून उरलेली रक्कम लिलावात उर्वरित खेळाडूंवर खर्च करता येणार होती. ती सर्व प्रक्रिया आता पार पडली आहे आणि लिलावानंतरही खेळाडूंकडे काही रक्कम शिल्लक आहे. त्या पैशाचं काय करणार हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा करताना गावसकरांनी विराटची तुलना केली नदाल, फेडरर आणि जोकोविचशी…)
हा पैसा संघ मालक उर्वरित हंगामात कधीही वापरू शकतील. जर संघातील एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, किंवा आणखी काही कारणांनी हंगाम अर्धवट सोडला तर या खेळाडूसाठी बदली खेळाडू विकत घेण्यासाठी फ्रँचाईजींना हे पैसे वापरता येतील. पण, यातही एक मेख आहे. नवीन विकत घेणार असलेला खेळाडू दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूपेक्षा महागडा असून चालणार नाही. म्हणजेच पृथ्वी शॉ ७५ लाख रुपयांच्या आधारभूत किमतीवर विक्रीशिवाय राहिला. आता पृथ्वी शॉला पुन्हा विकत घ्यायचं असेल तर संघाबाहेर जात असलेल्या खेळाडूची किंमत ही ७५ लाखांपेक्षा कमी असली पाहिजे. पण, या नियमामुळेच लिलावात विक्रीशिवाय राहिलेल्या खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे अजून पूर्णपणे बंद झालेले नाहीत. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून महिला ताब्यात)
लिलावानंतरही संघ मालकांकडे राहिलेली रक्कम पाहूया,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ७५ लाख रु
चेन्नई सुपर किंग्ज – ५ लाख रु
दिल्ली कॅपिटल्स – २० लाख रु
गुजरात टायटन्स – १५ लाख रु
कोलकाता नाईट रायडर्स – ५ लाख रु
मुंबई इंडियन्स – २० लाख रु
लखनौ सुपर जायंट्स – १० लाख रु
सनरायझर्स हैद्राबाद – २० लाख रु
पंजाब किंग्ज – ३५ लाख रु
राजस्थान रॉयल्स – ३० लाख रु
हेही पहा –
Join Our WhatsApp Community