- प्रतिनिधी
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीचे २३० पेक्षा अधिक उमेदवार जिंकून आलेत. जिंकून आलेल्या उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना आता फक्त एकच सभागृहाचे सदस्यत्व मिळणार आहे. त्यानुसार सहा जागा रिक्त होणार आहे. यासाठी पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्यात निवडणुका (Election) होणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
(हेही वाचा – Cheetah Kuno: कुनो नॅशनल पार्कमधील ‘त्या’ चित्त्यांच्या दोन बछड्यांचा मृत्यू)
विधान परिषदेतून विधानसभेत कोण कोण आले?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार जिंकून आलेत. ज्यामध्ये हल्लीच विधान परिषदेवर गेलेले काही आमदार देखील आहेत. यामध्ये अक्कलकुआ मतदारसंघातून आमश्या पाडवी. लातुर ग्रामीण मतदारसंघातून भाजपाचे रमेश कराड, नागपूर मध्य मतदारसंघातून प्रवीण दटके, जतमधून गोपीचंद पडळकर, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, तर अजित पवार गटातील राजेश विटेकर हे पाथरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यामध्ये चार भाजपाचे तर शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रत्येकी एकेक आमदार आहेत. (Election)
आमश्या पाडवी, रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे याआधी विधान परिषदेवर आमदार आहेत. ते आता विधानसभा निवडणुकीत जिंकून आले आहे. त्यामुळे या सहा आमदारांना एका सभागृहातील सदस्यत्वपद सोडावे लागणार आहे.
(हेही वाचा – Rishabh Pant : रिषभ पंतला कर वजा जाता २७ कोटींपैकी किती रक्कम मिळणार?)
नियम काय सांगतो?
दरम्यान, एकाचवेळी दोन सभागृहांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित सहा विधानसभा सदस्यांना विधान परिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही; कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द होते. (Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community