आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते नवी मुंबई (Mumbai to Navi Mumbai) दरम्यानचा प्रवास भविष्यात गतिमान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) हे अंतर केवळ १७ मिनिटांमध्ये पार करता येईल. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ठाणे येथे एका सभेमध्ये वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवेची घोषणा केली. मुंबई ते नवी मुंबईसाठी रस्ते मार्गे जवळपास एक तास मोजावा लागतो. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वॉटर टॅक्सी सेवेमुळे हाच कालावधी अवघ्या १७ मिनिटांवर येणार आहे. (Water Taxi)
पर्यावरणपूरक आणि वेळ वाचविणाऱ्या या सेवेमुळे मुंबईकरांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय उपब्लध होईल. वॉटर टॅक्सी से-वेचा (Water taxi sea-way) पहिला टप्पा मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जेट्टी बांधण्यात आली आहे.
पॅरिस आणि न्यूयॉर्क शहरांमध्ये वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवा यशस्वी ठरली आहे. भारतात २०२० मध्ये केरळमध्ये पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. मुंबईतील वाहनांची वाढती संख्या आणि दररोज होणारी वाहतूक कोंडी पाहता इकोफ्रेंडली वॉटर टॅक्सी सेवेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.