- ऋजुता लुकतुके
अर्थ मंत्रालयाने पॅन २.० प्रकल्पाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला क्यू आर कोड असलेलं पॅन कार्ड बघायला मिळणार आहे. त्याचा उपयोग पॅन तसंच टॅनचा वापर अधिक सोपा, सुटसुटीत करण्यासाठी होणार आहे. शिवाय अशा आधुनिक पॅनचा वापर तीन महत्त्वाच्या सेवांसाठी एकत्रित करता येणार आहे. देशात सध्या ७८ कोटी पॅन कार्डांचं वितरण झालेलं आहे. तर ७३.२८ टॅन कार्ड आहेत. पण, या कार्डांवर मिळणाऱ्या सेवा आता अधिक कार्यक्षम होतील. सध्या ई-फायलिंग, युटीआयआयटीएसएल आणि प्रोटिऑन ई-जीओव्ही असा तीन पोर्टलवर पॅन संबंधित सेवा विस्तारलेल्या आहेत. या तीनही सेवा एकाच क्लिकवर येतील. (Pan Card 2.0)
(हेही वाचा – Rishabh Pant : रिषभ पंतला कर वजा जाता २७ कोटींपैकी किती रक्कम मिळणार?)
पॅन २.० च्या अंमलबजावणीमुळे या सर्व सेवा एका, एकीकृत पोर्टलमध्ये एकत्रित होणार आहे. पॅन २.० हा एक मंच तयार होईल. पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, माहिती अद्ययावत करणं, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पॅन कार्डाचा ऑनलाईन वापर, पॅनची वैधता सिद्ध करणे अशी सर्वं कामं एकत्र हाताळळी जाऊ शकतील. पॅन २.० प्रकल्पाद्वारे प्रक्रिया सोपे करण्याचा, विलंब टाळण्याचा आणि तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे. (Pan Card 2.0)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा करताना गावसकरांनी विराटची तुलना केली नदाल, फेडरर आणि जोकोविचशी…)
पॅन २.० प्रकल्प डिजिटल इंडिया उपक्रमाशी संलग्न होण्याच्या दिशेने देखील एक महत्त्वाचे पाऊल मानलं जातंय. विनिर्दिष्ट सरकारी एजन्सींच्या सर्व डिजिटल सिस्टीमसाठी पॅन एक सामाईक ओळखकर्ता म्हणून प्रस्थापित करताना तो पर्यावरण-स्नेही कागदविरहित प्रक्रियांवर भर देणारा आहे. (Pan Card 2.0)
(हेही वाचा – मंत्रीपद, विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची Ramdas Athawale यांची मागणी)
पॅन २.० ची प्रमुख वैशिष्ट्ये :
- नागरिकांना पॅन/टॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकच पोर्टल. त्यामुळे सेवा सुटसुटीत होईल.
- कागदपत्रे कमी करण्यासाठी पर्यावरण-स्नेही कागदविरहित प्रक्रियांवर भर.
- जलद प्रक्रिया कालावधीद्वारे पॅन मोफत जारी केले जाईल
- पॅन डेटा व्हॉल्टसह वाढीव सुरक्षा उपायांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि लोकसंख्याशास्त्रीय आकडेवारीचे संरक्षण केले जाईल.
- वापरकर्त्यांच्या समस्या आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर
- जलद सेवा वितरण, प्रभावी तक्रार निवारण आणि संवेदनशील डेटाचे उत्तम संरक्षण सुनिश्चित करून करदात्यांचा या सेवेच्या वापराचा एकंदर अनुभव सुधारण्यासाठी या अद्ययावतीकरणाची रचना केली आहे.
- या प्रकल्पामुळे वापरकर्त्यांना पॅन/टॅनसाठी ऑनलाईन अर्ज करणे, त्यांचे तपशील अद्ययावत करणे आणि पॅन माहिती डिजिटल पद्धतीने प्रमाणित करणे सोपे होईल.
या प्रक्रियांचे एकत्रीकरण करून आणि पुनर्अभियांत्रिकी करून, प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी एक अखंड, पारदर्शक आणि सर्वसमावेशक प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. (Pan Card 2.0)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community