‘लखनऊ’ हे शहर तेथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी तर प्रसिद्ध आहेच पण ते अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘चिकनकारी’ (Chikankari Embroidery) कापड. मुघल राणी नूरजहाँ या राणीने ही पद्धत शोधून काढली अशी मान्यता आहे. चिकनकारी हे एक प्रकारचे भरतकाम असून पर्शियन भाषेत त्याला ‘चिकन’ असे म्हणतात. ‘चिकनकारी’ या प्रकारात सुई घाग्याने पातळ कापडावर भरतकाम करून सुंदर नक्षीकाम केले जाते.
(हेही वाचा-कॉल सेंटरमध्ये तरुणांकडून सायबर फसवणूक प्रकरणी NIA ची 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी)
भारतात या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘चिकनकारी’असे नाव तयार झाले अशी मान्यता आहे. मऊ मुलायम कापडावर केलेल्या या कलेला भारतातच नाही तर परदेशातही खूप मागणी आहे. या उन्हाळ्यात जर तुम्हाला स्टायलिश लूक सोबतच रॉयल फिल हवा असेल तर तुम्ही चिकनकारीला पसंती देऊ शकता. (Chikankari Embroidery)
(हेही वाचा-Banganga Temple : मुंबईतील बाणगंगा कशासाठी प्रसिद्ध आहे?)
इराणमधून भारतात आलेल्या पर्शियन लोकांकडून ही कला भारतात आली असे मानले जाते. त्याकाळात फक्त पांढऱ्या शुभ्र कापडावर रेशमाच्या धाग्याच्या साहास्याने भरतकाम केले जायचे. पुढे सतराव्या शतकात मुघलकाळात सम्राट जहांगीरची बेगम ‘नूर जहाँ’हिने या कलेला राजाश्रय दिला अशी मान्यता आहे. मुघलकाळातील काही स्थापत्यकलेतही चिकनकारी आपल्याला पाहायला मिळते. आज नवाबांच्या शहरात म्हणजेच लखनौमध्ये चिकनकारीची मोठी बाजारपेठ पाहायला मिळते. (Chikankari Embroidery)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community