Raj Thackeray यांची पराभूत उमेदवारांसोबत बैठक; काय झाली चर्चा ?

123
राज्यात विधानसभा निवडणूक (assembly Election 2024) पार पडून महायुती मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. त्यामुळे इतर सर्वच छोटी पक्ष नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे अलर्ट झाले आहेत. मुंबईतील उमेदवारांसोबत बुधवारी चिंतन बैठक झाल्यानंतर ते गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात दाखल झाले होते. यावेळी मुंबईतील पदाधिकारी सोडून इतर पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांसोबत निवडणुक संदर्भात चर्चा केल्या. अशी माहिती मनसे नेते बाबू गावस्कर यांनी दिली. (Raj Thackeray)

बैठकीत काय झाली चर्चा ? 
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याविषयी साईनाथ बाबर (MNS leader Sainath Babar) म्हणाले, “गेल्या पाच वर्षांत महायुती आणि महाविकास आघाडीचं तोडाफोडीचं राजकारण, जाती पातीचं राजकारण झालेलं असताना मनसेला कमी मतं मिळाली. याविषयी आपआपल्या मतदारसंघातील परिस्थिती उमेदवारांनी राज ठाकरेंना समजून सांगितली. हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कधी लोकांमध्ये गेले नाहीत, विकासकामे केली नाहीत. आम्ही लोकांमध्ये गेलो तेव्हा लोक आम्हाला म्हणाले की आम्हाला बदल हवाय, विकास हवाय. या सर्वांबाबत त्यांची भूमिका राज ठाकरे येत्या काळात मांडतील.” राज्यभरात झालेल्या निवडणुकीचा आढावा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घेतला. काही उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. यावेळी उमेदवारांनी आपल्याला आलेले सगळे अनुभव राज ठाकरेंना सांगितला.

(हेही वाचा – कॉल सेंटरमध्ये तरुणांकडून सायबर फसवणूक प्रकरणी NIA ची 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी)

तसेच कार्यकर्ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नागरिकांमध्ये उत्साह नाही, असं चित्र दिसत आहे. असं मनसे नेते बाबू वागस्कर (MNS leader Babu Vagaskar) यांनी सांगितलं. येणाऱ्या सर्व निवडणुका मनसे लढणार जोमाने लढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Election : राज्यात पुढच्या महिन्यातच पुन्हा निवडणुकांचे बिगुल वाजणार, सहा जागांसाठी होणार निवडणूक ?)

मनसेचे मोठ-मोठे नेते पडले

तत्कालीन आमदार राजू पाटील यांच्यासह संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव असे मनसेचे मोठे शिलेदार निवडणुकीत पडले. राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या पराजयाचा बसला. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना त्यांना होमग्राऊण्ड माहीम विधानसभा मतदारसंघातच (Mahim Assembly Constituency) पराभवाला सामोरं जावं लागलं.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.