शिवसेना नेते Ramdas Kadam यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, उद्धव ठाकरे कुटुंबासह…

107
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली असून, महायुती मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. तर महाविकास आघाडीचा ‘सुपडा साफ’ झाला आहे. विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना उबाठा पक्ष (Shiv Sena UBT) महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री २ वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. (Ramdas Kadam)
प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना रामदास कदम म्हणाले की, “मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील, असे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा.” बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी त्यांनी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलंय, त्या पापाचं प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

(हेही वाचा – सियाचिन, कारगिल युद्धभूमीवर पर्यटन शक्य; लष्करप्रमुख Upendra Dwivedi यांची माहिती)

रामदास कदम सहकुटुंब साईंच्या दर्शनाला…

दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम हे गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी कदमांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत, असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.