Delhi Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा लढणार

49
Delhi Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा लढणार
  • प्रतिनिधी 

दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election) अगदी तोंडावर आली आहे. त्यातच आम आदमी पक्षाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्लीच्या निवडणुका आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा म्हणून हा निर्णय पक्षांच्या वतीने घेण्यात आला आहे. पक्षाला चार राज्यांत प्रादेशिक पक्षाचा दर्जा हवा आहे. महाराष्ट्र, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आपण लवकरच राष्ट्रीय दर्जा परत मिळवू, असा विश्वास खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Unified Insurance : एकच कंपनी देणार सर्व प्रकारचे विमा संरक्षण, विमा क्षेत्रातील मोठा बदल)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने महाराष्ट्रात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या पक्षाचे 41 आमदार निवडून आले आहेत. महायुतीतील भाजपा आणि शिवसेना या पक्षांनीही अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यानंतर आता अजितदादांनी पक्षाला राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे दिल्लींसह विविध राज्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Assembly Election Results 2024 : वंचितचा फटका कुणाला?)

या बैठकीत महाराष्ट्रातील विजयाबद्दल पक्षाच्या वतीने अजितदादा आणि सर्व नेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे पुढचे लक्ष्य आता दिल्लीची विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election) असल्याचे स्पष्ट केले. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पक्षाकडून लढवली जाणार असल्याच प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.