Nashik पालकमंत्री पदावरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता!

52
Nashik पालकमंत्री पदावरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता!
  • खास प्रतिनिधी 

नाशिक (Nashik) जिल्ह्यात महायुतीतीलच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) पक्षाचे सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार होते तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर मगन भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवली. त्यात कांदे यांनी समीर भुजबळ यांचा जवळपास ९० हजार मतांनी पराभव केला. (Nashik)

(हेही वाचा – आता OTP मिळण्यास जास्त वेळ लागणार; जाणून घ्या, ट्रायचे नवे नियम काय आहेत?)

कांदे, भुजबळ ‘सागर’वर

निवडणूक निकाल लागले आणि २-३ दिवसातच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाली आणि नवे आमदार, नेत्यांची रिघ फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर लागली. बुधवारी २७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी शिवसेना आमदार सुहास कांदे तसेच येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ ‘सागर’वर गेल्याची माहिती आहे. (Nashik)

संभाव्य मुख्यमंत्री

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीचा भाग असल्याने नव्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री घेत असल्याने कदाचित दोन्ही आमदारांनी संभाव्य मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची भेट घेतली असावी. (Nashik)

(हेही वाचा – INS Arighat वरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)

भुजबळांकडे पालकमंत्री पद नको

भुजबळ आणि कांदे यांचे वैर जिल्ह्यात सर्वश्रूत आहे. मतदानाच्या दिवशीही २० नोव्हेंबर २०२४ ला कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात मतदारांना मतदानाला जाण्यापासून रोखण्यावरून खटके उडाले होते. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि मग वाद शांत झाला. कांदे यांना मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करावा लागेल, मात्र पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्र्याकडे शब्द टाकावा लागेल. कांदे यांनी फडणवीस यांच्याकडे स्वतःसाठी पालकमंत्री पद मागितले नसेल पण भुजबळ यांच्याकडे पालकमंत्री पद सोपवू नये, अशी मागणी निश्चित केली असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Nashik)

महाजन, भुजबळ की भुसे?

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद २०१४ ते २०१९ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील आमदार गिरीश महाजन यांच्याकडे होते तर पुढे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अडीच वर्षे २०२२ पर्यंत आणि २०२२ ते आत्तापर्यंत पालकमंत्र्यांची जबाबदारी शिवसेनेचे दादाजी भुसे याच्याकडे होती. आता नवीन मुख्यमंत्री पदभार स्वीकारतील आणि पुन्हा नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईल, यात महाजन, भुजबळ की भुसे यापैकी कोणाची वर्णी लागते याकडे नाशिककरांचे लक्ष लागून राहिले आहे. (Nashik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.