राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली असून, महायुती (Mahayuti) मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) ‘सुपडा साफ’ झाला आहे. विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरल्याप्रमाणे रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये EVM मशीनमध्ये बदल करून महायुती मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. असा आरोप मविआच्या नेत्यांनी केला. यावर पलटवार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. (Jitendra Awhad)
(हेही वाचा – CHIEF MINISTER : काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय?)
पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, “माझं खुल आव्हान आहे, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad resigns) यांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेत घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”, असं ओपन चॅलेंज आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं आहे.
या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळे आलेले यश नाकारण्याचा मविआचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. लोकसभेला यश मिळालं ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशाप्रकारे रडीचा डाव सुरू आहे”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली.
(हेही वाचा – INS Arighat वरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)
महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजपा १३२ जागा, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ४१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६, उबाठा गटाला २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष इतर यांना १२ जागा मिळाल्या आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community