महिलांसाठी Cervical Cancer ठरतोय धोकादायक

141
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारामुळे अनेक महिलांचा जीव जात आहे. ह्युमन पेंपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा विषाणू या कर्करोगास कारणीभूत आहे. एकूण नऊ प्रकारचे विषाणू गर्भाशयाच्या मुखाच्या देशातील ९८.४ टक्के कर्करोगासाठी जबाबदार आहेत. १५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांना (Ladies) प्रभावित करणारा हा भारतीय महिलांमधील दुसरा सर्वात मोठा कर्करोग आहे. एवपीव्ही लस या आजारावर परिणामकारक असून ती महिलांना अनिवार्य करण्याची शिफारस तन्ज्ञांनी केली आहे. (Cervical Cancer)
१५ ते २५ वयोगटातील मुलींमध्ये या कर्करोगाची नवनवीन प्रकार आढळत आहे. एचपीव्ही संसर्ग हा जगभरातील महिलांमध्ये चौथा सर्वात मोठा कर्करोग आहे. एकूण कर्करोगापैकी या आजाराचे प्रमाण सुमारे ७० टक्के आहेत. १५ ते ४४ वर्षे वयोगटातील भारतीय महिलांना प्रभावित करणाऱ्या कर्करोगांमध्ये हा आजार दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(हेही वाचा – मानवी तस्करी प्रकरणी NIA ची देशभरात 22 ठिकाणी छापेमारी)

कर्करोगाचे (Cancer) प्रमाण रोखण्यासाठी किशोरवयीन मुलींना लसीकरण अनिवार्य करण्याची शिफारस रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टच्या (Royal College of Obstetricians and Gynaecologists) अखिल भारतीय समन्वय समितीमधील डॉक्टरांनी मुंबईत झालेल्या एका परिषदेत केली. एचपीव्हीबाबत जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. ही लस एचपीव्हीमुळे होणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक कर्करोगांना रोखण्यासाठी प्रभावी आहे, असे डॉ. उमा राव म्हणाल्या.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.