आता दुचाकीवरील दोघांनाही घालावे लागणार Helmet; वाहतूक विभागाचे आदेश

70
आता दुचाकीवरील दोघांनाही घालावे लागणार Helmet; वाहतूक विभागाचे आदेश
आता दुचाकीवरील दोघांनाही घालावे लागणार Helmet; वाहतूक विभागाचे आदेश

विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट (Helmet) दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. विना हेल्मेट दुचाकीस्वरासह सहप्रवाशाला देखील आता दंड होणार आहे. राज्याच्या वाहतूक विभागाकडून (Motor Vehicles Department) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात न घेण्याची भाजप कार्यकर्त्यांची भूमिका)

ई-चलन मशीनमध्ये बदल करणार

आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. आता मात्र सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. सध्या विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत देखील कारवाई केली जात आहे

पुणे (Pune) शहरात दररोज अशा प्रकारे सुमारे चार हजार चालकांवर कारवाई केली जाते. मात्र त्यातून दंड भरणाऱ्यांची संख्या कमी आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.