राज्यात थंडी पडली असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद १० अंशाखाली झाली आहे. तसेच मुंबई उपनगरांतही किमान तापमान २० अंशाच्या खाली नोंदले गेले आहे. मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा अनुभव घेत आहेत. मात्र, काही राज्यांवर चक्रीवादळाचं (Cyclone Fengal Alert) संकट घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसह (Tamilnadu) अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Maharashtra CM : महायुतीच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत दिल्लीत बैठक; अखेर कोण होणार मुख्यमंत्री ?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण -पश्चिम बंगालाच्या खाडीवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर -पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबलीपूरमदरम्यान जाणवण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 70 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि पँडेचेरीमध्य (Pondicherry) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Cyclone Fengal Alert)
हेही वाचा- Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या तिघांना ५ वर्षांचा कारावास
तामिळनाडूसह आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ श्रीलंकनं किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनार पट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं नकुसान होऊ शकतं. (Cyclone Fengal Alert)
हेही वाचा- Sanatan Sanstha : ३० नोव्हेंबरला सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा
चक्रीवादळाच्या निर्मितीमुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे संध्याकाळ होत असताना तापमानात घसरण सुरू होते. सकाळीही धुक्याचा प्रभाव वाढू लागला आहे. अशा स्थितीत या राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Cyclone Fengal Alert)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community