समुद्राच्या तळाशी मिळाला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; Malvan मध्ये विविध संस्था सक्रीय

57
समुद्राच्या तळाशी मिळाला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; Malvan मध्ये विविध संस्था सक्रीय
समुद्राच्या तळाशी मिळाला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; Malvan मध्ये विविध संस्था सक्रीय

समुद्रात सूक्ष्म प्लास्टिक वाढत आहे. यातून मानवाला कॅन्सरसारख्या रोगांचा धोका आहे. वाढत्या समुद्री कचऱ्याच्या समस्येवर काम करताना मालवण (Malvan) येथून सुरुवात केली आहे. येथील समुद्रतळ जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी समुद्री कचऱ्याचीही समस्या मोठी आहे. याचा परिणाम येथील सागरी जैवविविधतेवर पर्यायाने मासेमारी व पर्यटन उद्योगावर (Tourism industry) होत आहे, यासाठी वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणात कार्यरत असलेले पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन यांनी सागरतळाची स्वच्छता करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

(हेही वाचा – आता दुचाकीवरील दोघांनाही घालावे लागणार Helmet; वाहतूक विभागाचे आदेश)

सागर शक्ती या उपक्रमांतर्गत सागरतळाची स्वच्छता करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. याच्या प्रयोगाची सुरुवात बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort) परिसरातील समुद्रातून करण्यात आली. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. समुद्रतळाच्या एक हेक्टर परिसरातून सहा स्कूबा डायव्हर्सनी ३ तासात ३०० किलो प्लास्टिक कचरा बाहेर काढला.

वन शक्ती संस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board), भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभाग यांच्या सहकार्याने, सागर शक्ती, मालवण नगर परिषद, महाराष्ट्र वन विभाग, यूथ बीट फॉर क्लायमेट, नीलक्रांती आदी संस्थांनी एकत्रित येत ही मोहीम राबविली.

या कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्या (Plastic waste), प्लास्टिक पिशव्या, खाद्य पदार्थांची वेष्टने, काचेच्या बाटल्या, तुटलेली जाळी असे घटक मिळाले. (Malvan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.